नेत्याने महिलेला नग्न केले, नंतर… 35 हजाराचे कर्ज न फेडल्यामुळे दिली वाईट शिक्षा, व्हिडीओ व्हायरल
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका नेत्याने 35 हजाराचे कर्ज न फेडल्यामुळे महिलाला जी शिक्षा दिली ऐकून पोलिसही हादरले.

बांगलादेशातील कोमिला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे केवळ 35 हजाराच्या उधारीमुळे एका हिंदू महिलेसोबत जे काही घडलं, ते थरकाप उडवणारं आहे. फजर अली, जो स्वतःला खालिदा जियाच्या बीएनपी (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी)शी संबंधित नेता सांगतो, याच्याकडून पीडितेच्या कुटुंबाने काही काळापूर्वी 35 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, ज्याची परतफेडीची मुदत संपली होती.
या कारणाने फजर अली संतापला होता. ही घटना मागील गुरुवारी रात्रीची आहे. पीडित महिला आपल्या लहान मुलीसोबत घरी एकटी होती आणि कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेले होते. रात्री साधारण 11 वाजता फजर अली तिच्या घरी पोहोचला. त्याने दार ठोठावलं, पण भीतीमुळे महिलेने दार उघडण्यास नकार दिला. यामुळे आरोपी चिडला. त्याने दार जोरात ढकलून तोडलं आणि घरात घुसला.
वाचा: मृत्यूनंतर 13 दिवस आत्मा पृथ्वीवर का राहतो? गरुड़ पुराणात काय आहे उल्लेख?
महिलेचे कपडे फाडले
घरात शिरताच फजर अलीने महिलेचे कपडे फाडले आणि जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या किंकाळ्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचल्या, तेव्हा ते धावत घटनास्थळी आले. त्यांनी महिला आणि आरोपीला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. याचवेळी कोणीतरी मोबाइलवर व्हिडीओही बनवला, पण खरी हकीकत कोणालाच माहीत नव्हती.
अलीऐवजी महिलेलाच मारहाण
सुरुवातीला जमावाने महिलेलाच दोषी समजून तिला मारहाण केली, पण जेव्हा महिलेने रडत आपली आपबिती सांगितली, तेव्हा सत्य सर्वांसमोर आलं. संतप्त जमावाचा राग आता आरोपीकडे वळला. फजर अलीला तिथेच मारहाण करण्यात आली, पण तो कसाबसा तिथून पळून गेला. सुरुवातीला तो कोमिलातील एका रुग्णालयात दाखल झाला, नंतर तिथून पळून तो राजधानी ढाक्काला पोहोचला. पण पोलिसांनीही हार मानली नाही आणि त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला ढाक्काहून अटक केली.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर कोमिलासह अनेक ठिकाणी हिंदू समाजाने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध नोंदवला. लोकांची मागणी आहे की, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. या घटनेनंतर पोलिसही खडबडून जागे झाले. आतापर्यंत एकूण 5 जणांना अटक झाली आहे, यामध्ये बलात्काराचा आरोपी फजर अली आणि व्हिडीओ बनवणारे चार तरुण यांचा समावेश आहे. सर्वांची चौकशी सुरू आहे.
