AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले; दुसराही विद्यार्थी गंभीर; ट्रकचालकाला नागरिकांनी चोपले

आज दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते, त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याने चालणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरच ट्रक घातला, यामध्ये एक विद्यार्थी जागीच ठार झाला असून आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले; दुसराही विद्यार्थी गंभीर; ट्रकचालकाला नागरिकांनी चोपले
धुळ्यात नाशिक-नंदुरबार एसटीला अपघातImage Credit source: tv9
| Updated on: Aug 03, 2022 | 6:38 PM
Share

बेळगावः बेळगावमधील मराठा लाईफ इन्फंट्रीच्या (Belgaum Maratha Life Infantry) कॅम्प परिसरात (Camp Area) आज भरधाव ट्रकने शालेय विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकाला बेदम चोप दिला आहे. या अपघातात ठार (Truck Accident Student Death) झालेल्या विद्यार्थ्याचे अरहान बेपारी असं नाव असून याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. यावेळी संतप्त जमावानकडून कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळावरुन पोलिसांनी नागरिकांना हटवले आहे. संबंधित ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अरहान बेपारी या विद्यार्थ्याबरोबर आणखी एक विद्यार्थीही गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्रक थेट विद्यार्थ्याच्या अंगावरच

आज दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते, त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याने चालणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावरच ट्रक घातला, यामध्ये एक विद्यार्थी जागीच ठार झाला असून आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत विद्यार्थ्यांच्या अंगावर ट्रक जाऊन एक विद्यार्थी ठार तर दुसरा गंभीर झाल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकचालकाला चोप दिला आहे.

कँप परिसरात वाहनांचा अतिवेग

ज्यावेळी अपघात होऊन विद्यार्थी ठार झाला तो सगळा प्रसंग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. कॅम्प परिसरातच विद्यार्थी ठार झाल्याने कॅम्प परिसरात फिरणाऱ्या वाहनांच्या वेगमर्यादेवर निर्बंध घालण्याची मागणी येथील जनसामान्य नागरिकांनी केली आहे. कॅम्प परिसरापुढे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने सकाळी आणि दुपारी या रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते त्यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा घाला अशी मागणी आता पालकवर्गातून होऊ लागली आहे.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.