AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू नको म्हणून प्रेयसीचा हट्ट; प्रियकराने तिला संपवलं, त्यानंतर…

साहील आणि मुलगी गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. साहीलचे लग्न दुसरीकडे होणार होते. मुलीने याचा विरोध केला. त्यामुळं साहीलने तिला संपवलं. कारमध्ये गळा तिचा खून केला.

दुसऱ्या मुलीसोबत लग्न करू नको म्हणून प्रेयसीचा हट्ट; प्रियकराने तिला संपवलं, त्यानंतर...
Image Credit source: Google
| Updated on: Feb 14, 2023 | 4:29 PM
Share

नवी दिल्ली : श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब जेलमध्ये आहे. आफताब वालकरने श्रद्धाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. नवी दिल्लीत एक मुलीची हत्या करून तिचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरनगरची एका महिलेचा मृतदेह एका फ्रीजमध्ये सापडला. नजफगड गावाबाहेरील भागात धाब्यावर ही फ्रीज होती. आरोपी साहीलला पोलिसांनी अटक केली.

गळा दाबून खून

मुलीची हत्या कश्मिरी गेटजवळ आयएसबीटीजवळ गळा दाबून करण्यात आली. मुलीचा मृतदेह मित्राच्या गावी नेऊन धाब्यावर ठेवण्यात आला. आरोपीचे नाव साहील गहलोत आहे. तो २६ वर्षांचा आहे. साहीलला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे.

खून करण्याचे कारण काय?

कारमध्ये खून केल्यानंतर मृतदेह मित्राच्या धाब्यावरील फ्रीजमध्ये ठेवण्यात आला. प्राप्त माहितीनुसार, साहील आणि मुलगी गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. साहीलचे लग्न दुसरीकडे होणार होते. मुलीने याचा विरोध केला. त्यामुळं साहीलने तिला संपवलं. कारमध्ये गळा तिचा खून केला.

पोलिसांना सकाळी मिळाली सूचना

दिल्ली पोलिसांना आज सकाळी माहिती मिळाली. त्यानुसार युवतीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी साहीलला त्याच्या गावावरून अटक केली.

विचारपूस केल्यानंतर भयावह घटना पुढं आली. त्याने तिला आधी कारमध्ये संपवलं. त्यानंतर तिचा मृतदेह फ्रीडमध्ये ठेवला. याची माहिती पोलिसांना झाली. पोलीस घटनास्थळी गेले. फ्रीडमधून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर साहीलचा शोध घेतला. त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. विवाहास अडचण ठरत असल्याने साहीलने तिला संपवल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.