कुत्र्याचे डोके कापले, भगवान शंकरासमोर ठेवले! चार दिवस घरात… पोलिसांचाही थरकाप उडला
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलने सर्वात जास्त जीव असलेल्या पाळीव श्वानाचे डोकं कापून थेट देवासमोर ठेवले.

बेंगलुरूच्या महादेवपुरा परिसरात एका महिलेने कुत्र्याचा गळा कापून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही तिच्या घरातून एक कुत्रा गायब झाला होता आणि लोकांना संशय होता की तो कुत्रा तिने काळ्या जादूसाठी मारला असावा. आता या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. काही दिवसांपूर्वी त्या महिलेच्या घरातून एक कुत्रा अचानक गायब झाला होता. त्यावेळी शेजाऱ्यांना संशय होता की त्या कुत्र्याला तांत्रिक कृत्यासाठी, म्हणजेच काळ्या जादूसाठी मारले असावे. आता नुकत्याच एका कुत्र्याच्या संशयास्पद मृत्यूने सर्वांचे लक्ष पुन्हा या महिलेकडे वेधले आहे.
महिला एकटीच फ्लॅटमध्ये राहत होती
या महिलेचे नाव त्रिपर्णा आहे. आपल्या व्यवसायात तोटा झाल्याने ती एकटीच चार कुत्र्यांसह एका फ्लॅटमध्ये राहत होती. ती आता कुत्र्यांशी फारशी बोलत नव्हती, किंवा शेजाऱ्यांशीही तिचा संपर्क नव्हता. असे सांगितले जाते की, ज्या कुत्र्याचा तिला सर्वात जास्त लळा लागला होता, त्याचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
कुत्र्याच्या जीवासाठी भगवंताला प्रार्थना केली होती
त्रिपर्णाने तिच्या सर्वात प्रिय कुत्र्याच्या मृत्यूनंतर त्याला घरात भगवंताच्या फोटोसमोर ठेवले होते. त्याच्या जीव वाचवण्यासाठी प्रार्थना केली होती. पण कुत्रा मेल्यानंतर तिने त्याचा मृतदेह चार दिवस तसाच ठेवला.
फ्लॅटमध्ये दुर्गंधी पसरली, शेजाऱ्यांनी केली तक्रार
कुत्र्याचा मृतदेह सडायला लागला आणि संपूर्ण अपार्टमेंटमध्ये दुर्गंधी पसरली. तेव्हा शेजाऱ्यांनी बीबीएमपी (महानगरपालिका) आणि पोलिसांकडे तक्रार केली. जेव्हा पोलिस आणि बीबीएमपीची टीम फ्लॅटवर पोहोचली, तेव्हा हे प्रकरण समोर आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पोस्टमॉर्टम अहवालातून खुलासा
आता त्रिपर्णाविरुद्ध पशुहत्या, प्रतिबंध आणि संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महादेवपुरा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. कुत्र्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आणि अहवाल आल्यानंतर या गोष्टीला पुष्टी मिळाली की त्याची हत्या करण्यात आली होती.
