टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा; नाशिकमध्ये 5 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या

नाशिकमध्ये टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघा सट्टेबाजारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एकूण 5 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा; नाशिकमध्ये 5 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना बेड्या
नाशिकमध्ये पोलिसांनी सट्टेबाजाला बेड्या ठोकल्या.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Nov 01, 2021 | 10:40 AM

नाशिकः नाशिकमध्ये टी-20 वर्ल्डकप सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघा सट्टेबाजारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून एकूण 5 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टी-20 वर्ल्डकप सामने सध्या फॉर्मात आहेत. भारत-पाकिस्तान मॅचची बात काही औरच असते. मात्र, भारताला पाकिस्तानकडून हार पत्करावी लागली. ही हुरहुर काही केल्या कमी होत नाही. पण अनेक जण या सामन्यांवर सट्टा लावून त्यातूनही झटपट पैसे कमाईचे साधन शोधताना दिसत आहेत. नाशिकमध्येही नेमके असेच सुरू होते. एकीकडे वेडे क्रिकेटप्रेम आणि त्यावर मात करणारा हा जुगार. याची खबर गुन्हेशाखेच्या युनीट क्रमांक दोनचे पोलीस हवालदार देवकिसन गायकर यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली.

येथे सुरू होता सट्टा

उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सुराणा हॉस्पिटल चौकात, देवळालीगाव येथे ही सट्टेबाजी सुरू होते. या ठिकाणी वसीम रशीद शेख हा एका दुचाकीवर बसून (एम. एच. 04 झेड. डब्ल्यू 5949) क्रिकेट वर्ल्डकपमधील साखळी सामन्यावर सट्टा चालवित होता. त्यासाठी मोबाइलमधील अॅपवर विकेट, रन आणि स्कोअपर पाहून सट्टेबाजी सुरू होती. याची खात्री पोलिसांनी पटली. त्यांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. तेव्हा सट्टेबाजी सुरू असल्याचे दिसले. पोलिसांनी वसीम रशीद शेख (रा. हरीश्रद्धा सोसायटी, सी विंग, गाडेकर मळा, देवळाली गाव, नाशिकरोड) आणि अमोल शिवाजी नागरे (रा. दत्तनगर, बंधुप्रेम चाळ, पंचवटी, नाशिक) यांना बेड्या ठोकल्या. त्यांनी आपण विजय नंदवाणी याच्या सांगण्यावर कमिशनवर सट्टेबाजी चालवत आहोत. श्रीलंकाविरुद्ध दक्षिण आफ्रिका सान्यावर मोबाइलमधील अॅपवरून स्कोअर पाहून लोकांकडून पैसे स्वीकारत आहोत आणि हा जुगार सुरू आहे, अशी कबुली दिली.

मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून रोख 3 लाख 48000 हजार रुपये, दोन मोबाइल, दोन दुचाकी, एक सट्ट्यांची नोंद असलेली वही असा एकूण 5 लाख 8000 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनीट क्रमांक दोनचे अधिकारी व अंमलदान सपोनि अभिजित सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, पोपट कारवाळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्यामराव भोसले, पोलीस हवालदार देवकिसन गायकर, शंकर काळे, प्रकाश भालेराव, सुगन साबरे, गुलाब सोनार, यशवंत बेंडकुळी, मधुकर साबळे, सनील आहेर, यादव डंबाळे, प्रकाश बोडके यांनी केली.

इतर बातम्याः

आन तिरंगा शान तिरंगा, फडकत ठेवू नभांगणीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे नाशिक जिल्ह्यात जोरदार आयोजन

हुरहुर लावणारा पिंपळपार पुन्हा बहरणार; दिवाळी पाडव्याला नाशिकमध्ये पंडित हरीश तिवारींची मैफल!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें