AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL सट्टा लावताय? जाणून घ्या, पकडले गेल्यास तुमचं काय होईल!

IPL चा थरार शिगेला पोहोचलाय! चौकार, षटकार आणि विकेट्सवर तुमचंही लक्ष आहेच. पण याच उत्साहात काहीजण एका वेगळ्याच 'खेळा'त गुंतले आहेत... तो म्हणजे ऑनलाइन सट्ट्याचा! 'दोन पैसे जास्त मिळतील' या आशेने तुम्ही पण मॅचवर पैसे लावत असाल, तर जरा थांबा! तुम्हाला माहित आहे का, भारतात हे करणं किती मोठा गुन्हा आहे? यासाठी तुम्हाला अटक होऊन तुरुंगातही जावं लागू शकतं! वेळीच सावध व्हा आणि या जाळ्यापासून दूर राहा.

IPL सट्टा लावताय? जाणून घ्या, पकडले गेल्यास तुमचं काय होईल!
ipl satta
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 10:07 PM
Share

देशभरात आयपीएलची क्रेझ सध्या प्रचंड वाढली आहे. आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देत चाहते उत्साहात सामना पाहत आहेत. पण याच क्रिकेटच्या रंगतदार वातावरणात एक काळी बाजूही झपाट्याने पसरत चालली आहे ती म्हणजे ऑनलाइन सट्टेबाजी!

सामना जिंकला की नाही, फलंदाज किती धावा करणार, पुढचा बॉल कसा असेल, कोणता संघ अंतिम फेरी गाठणार अशा प्रत्येक गोष्टीवर पैसे लावले जात आहेत. आणि झटपट पैसा कमावण्याच्या या मोहात अनेक तरुण आपलं आयुष्य अडचणीत टाकत आहेत.

कसा चालतो ऑनलाइन सट्ट्याचा खेळ?

सट्ट्याचा हा सगळा व्यवहार फारच गुप्तपणे चालतो. बुकी नावाचे लोक यामागे प्रमुख भूमिका बजावतात. हे बुकी बहुतेक वेळा लहान शहरांतून किंवा अगदी एखाद्या खोलीत बसून ऑनलाइन नेटवर्कद्वारे सट्टा चालवतात.

त्यांनी मॅचच्या परिस्थितीनुसार, अगदी प्रत्येक बॉलवर किंवा ओव्हरवर पैशाचे भाव ठरवलेले असतात. लोक Mobile Wallets किंवा बँक खात्याद्वारे पैसे ट्रान्सफर करून सट्ट्यात सहभागी होतात. अशा पद्धतीने व्यवहार रोखीशिवाय होतो, म्हणून पोलिसांना हे जाळे शोधणं कठीण जातं.

भारतात सट्टेबाजी कायद्याच्या विरोधात!

भारतामध्ये सट्टा खेळणे किंवा खेळवणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. काही ठिकाणी सरकारकडून मान्यता असलेली लॉटरी किंवा कॅसिनो वगळता, कोणताही जुगार आणि सट्टा हा गुन्हाच मानला जातो.

आयपीएल मॅचेसवर सट्टा लावणे हे देखील याच कायद्यात येते आणि त्याला कोणतीही कायदेशीर परवानगी नाही.

सट्टा लावताना पकडले गेल्यास शिक्षा काय?

जर कोणतीही व्यक्ती सट्टा खेळताना किंवा खेळवताना पोलिसांच्या हाती लागली, तर तिच्यावर थेट कारवाई केली जाते.

1. ‘Public Gambling Act, 1867’ या कायद्यानुसार पोलिसांना सट्टेबाजांना अटक करण्याचा अधिकार आहे. 2. अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले जाते. 3. गुन्हा सिद्ध झाल्यास ₹200 दंड किंवा 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास, किंवा काही वेळा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकते.

याशिवाय राज्य सरकारच्या जुगारविरोधी कायद्यांनुसारही कधी कधी अधिक कठोर शिक्षा होऊ शकते.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना