BF GF News : रिलेशनशीपमधील भांडणं गेलीत टोकाला, पिस्तुल घेऊन तो आला पण झाला उलटाच गेम!

प्रेम झाल्यावर सुरूवातीचे दिवस सर्व व्यवस्थित असतं मात्र काही दिवसांनंतर कोणत्याही कारणावरून झालेला वाद कोणाच्यातरी जीवावर उठतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलंय.

BF GF News : रिलेशनशीपमधील भांडणं गेलीत टोकाला, पिस्तुल घेऊन तो आला पण झाला उलटाच गेम!
| Updated on: Jun 13, 2023 | 11:35 PM

नवी दिल्ली : अनेकदा बोललं जातं की कलियुग आहे, कुठे काय होईल काही सांगता येत नाही. रिलेशनशीपमधूनही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. प्रेम झाल्यावर सुरूवातीचे दिवस सर्व व्यवस्थित असतं मात्र काही दिवसांनंतर कोणत्याही कारणावरून झालेला वाद कोणाच्यातरी जीवावर उठतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं असून त्यामध्ये बॉयफ्रेंड बंदूक घेऊन गर्लफ्रेंडच्या गावात गेला होता. मात्र त्यानंतर काही उलटंच घडलं.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुर्शिदाबादच्या समशेरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक प्रियकर पिस्तुल घेऊन दोन मित्रांसह प्रेयसीच्या घरी जाण्यासाठी आला होता. यावेळी त्याच्यासोबत दोन मित्रही होते. तिन्ही तरुणांना शस्त्रांसह परिसरात शिरताना पाहून स्थानिक लोकांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. घटनेची माहिती मिळताच समशेरगंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एकाला गावकऱ्यांनी एकाला पकडले, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

अटक करण्यात आलेल्या तीन तरुणांपैकी एकाचे दिघरी गावातील तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद झाल्याने मुलीला हे नाते संपवायचं होतं. त्यानंतर प्रियकर तिला घाबरवण्यासाठी लोडेड पिस्तुल घेऊन गावात आला, मात्र तो तिच्या घरात शिरण्याआधीच स्थानिक लोकांनी त्याला घेरले. पोलिसांनी कथित प्रियकराला शस्त्रासह अटक केली आहे.

दरम्यान, प्रेमप्रकरणातून युवकांचा टोळका गावात शस्त्रांसह दाखल झाला होता की अन्य काही कारणाने याचा तपास पोलीस करत आहेत. तरुणांसह शस्त्रांसह पळून गेलेल्या साथीदारांचीही चौकशी सुरू आहे. या संदर्भात बंगाल पोलिसांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील समशेरगंज भागात शोध मोहीम सुरू केली आहे.