Crime : दोस्ता लय वाईट केलंस, मित्राच्या आईसोबतचे प्रेमसंबंध पडले महागात, शेवट झाला अत्यंत वाईट!
crime news : मैत्रीचं नातं हे प्रत्येकासाठी मौल्यवान असतं. आपण आपल्या मित्रासोबत प्रत्येक गोष्ट विश्वासाने शेअर करत असतो. पण त्याच मित्राने जर विश्वासघात केल्यावर मनात पेटते ती बदला घेण्याची आग.

Crime : प्रत्येकासाठी आपला मित्र हा अगदी भावासारखाच असतो. मैत्रीचं नातं हे प्रत्येकासाठी मौल्यवान असतं. आपण आपल्या मित्रासोबत प्रत्येक गोष्ट विश्वासाने शेअर करत असतो. पण त्याच मित्राने जर विश्वासघात केल्यावर मनात पेटते ती बदला घेण्याची आग. अशीच एक घटना समोर आली आहे जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
गेल्या दीड महिन्यांपासून उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये आव्हान बनलेल्या एका खून प्रकरणाचं गूढ पोलिसांनी उकललं आहे. हे प्रकरण मैत्रीत फसवणूक आणि अवैध संबंधांशी संबंधित आहे. आरोपी तरूणाने त्याच्या मित्राला आईसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. या गोष्टीचा राग तरूणाच्या मनात होता. त्यामुळे 63 दिवसांनी त्याने सुनियोजित कट रचून मित्राची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी तरूणाने मित्राचा प्रायव्हेट पार्टही कापला.
नेमकं काय घडलं?
हा धक्कादायक प्रकार 5 मे रोजी पहाटे घडला, या दिवशी पहाटे महानगरात कुकरेलला बांधून मृतावस्थेत सापडलेला गार्ड सिद्धार्थ तिवारीच्या हत्येशी संबंधित आहे. या घटनेचा खुलासा महानगर पोलिसांनी केला आहे. महानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत मिश्रा यांनी सांगितलं की, या प्रकरणातील आरोपी इटौंजा येथील रहिवासी असून अनुपम तिवारी असं त्याचं नाव आहे. तो लखनऊ येथील मदियानव येथे आई आणि भावासोबत भाड्याने राहत होता.
सिद्धार्थ तिवारी आणि अनुपम तिवारी हे एकमेकांचे मित्र होते. त्यामुळे ते दोघं एकमेकांच्या घरी येत जात होते. या दरम्यान, सिद्धार्थने अनुपमच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर सिद्धार्थ आणि अनुपमच्या आईची जवळीक वाढली, त्यानंतर अनुपमला सिद्धार्थवर संशय आल्याने त्याने त्याची हत्या केली. पोलिसांना घटनास्थळी अतुलचा मित्र अनुपम याचं लोकेशन सापडलं, कोठडीत त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने त्याने खुनाची कबुली दिली.
