बिहारमधील 38 वर्षीय महापौरांची हत्या, घराजवळच हल्लेखोरांचा गोळीबार

कटिहार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या संतोषी चौक भागात शिवराज पासवान राहत होते. आरोपींनी महापौरांचा पाठलाग केल्याचा संशय आहे. ते दुचाकीने घराजवळ पोहोचले असतानाच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.

बिहारमधील 38 वर्षीय महापौरांची हत्या, घराजवळच हल्लेखोरांचा गोळीबार
महापौरांची गोळी झाडून हत्या
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 11:23 AM

पाटणा : बिहारमधील कटिहारच्या महापौरांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बैठक आटोपून गुरुवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास घरी येत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये 38 वर्षीय शिवराज पासवान (Shivraj Paswan) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

नेमकं काय घडलं?

कटिहार पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या संतोषी चौक भागात शिवराज पासवान राहत होते. आरोपींनी महापौरांचा पाठलाग केल्याचा संशय आहे. ते दुचाकीने घराजवळ पोहोचले असतानाच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. महापौरांना तातडीने कटिहार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु दाखल करण्यापूर्वीच पासवान यांना मृत घोषित करण्यात आले.

हायप्रोफाईल मर्डर केस

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अद्याप समोर आलेले नाहीत. आम्ही छापेमारी सुरु केली आहे. किती हल्लेखोर होते, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. घटनास्थळ हे महापौरांच्या निवासापासून अवघ्या काही अंतरावर आहे, अशी माहिती एसडीपीओ अमरकांत झा यांनी दिली. हायप्रोफाईल मर्डर केस सोडवण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे.

हत्येचं नेमकं कारण अस्पष्ट

नऊ महिन्यांपूर्वीच शिवराज पासवान यांची बिहारमधील कटिहार शहराच्या महापौरपदी वर्णी लागली होती. पासवान यांच्या हत्येचं नेमकं कारणही अद्याप अस्पष्ट आहे. बाईकवर आलेल्या तिघा हल्लेखोरांनी पासवान यांच्यावर जवळून गोळी झाडली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

जळगावात उपमहापौरांवर गोळीबार

दरम्यान, जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर 25 जुलैच्या रात्री गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली होती. पिंप्राळा येथील त्यांच्या घरावर झालेल्या गोळीबारातून पाटील सुदैवाने बचावले आहेत. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे जळगावात प्रचंड खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार, जळगावातील धक्कादायक घटना

स्कॉर्पिओच्या ड्रायव्हर सीटखाली गावठी कट्टे, पोलीस समोर येताच पळापळ, मध्यप्रदेश ते राजस्थान व्हाया खान्देश पिस्तूल तस्करी?

(Bihar High profile Murder Case Katihar Mayor Shivraj Paswan shot dead near residence)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.