स्मशानभूमीजवळ कारमध्ये बड्या नेत्याची इश्कबाजी, महिलेसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं.. नंतर जे घडलं
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाजप नेते राहुल वाल्मिकी हे अंतर्वस्त्रांमध्ये गाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत आणि गर्दी पाहून ते लोकांचे पाय धरून माफी मागताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपुर परिसरातून एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा मंत्री राहुल वाल्मीकी यांना एका विवाहित महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले गेले आहे. ही घटना शिकारपुर कोतवाली परिसरातील कैलावन गावाजवळील स्मशानभूमीजवळ घडल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये भाजप नेते राहुल वाल्मीकी अंतर्वस्त्रात कारमधून बाहेर येताना दिसत आहेत आणि जमाव पाहून लोकांचे पाय धरून माफी मागताना दिसत आहेत. त्यांनी लोकांना व्हिडीओ न बनवण्याची आणि त्यांना जाऊ देण्याची विनंती केली. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने दुपट्ट्याने चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (11 जुलै) संध्याकाळची असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक लोकांनी स्मशानभूमीजवळ एक संशयास्पद कार उभी असलेली पाहिली. संशय आल्याने त्यांनी कारची तपासणी केली आणि राहुल वाल्मीकी यांना महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले.
व्हायरल झाला व्हिडीओ
यानंतर लोकांनी तातडीने मोबाईलने व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली, जो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओमध्ये राहुल वारंवार माफी मागताना आणि व्हिडीओ न बनवण्याची विनंती करताना दिसत आहेत. दुसरीकडे, राहुल वाल्मीकी यांच्या वडिलांचा दावा आहे की हा व्हिडीओ 5-6 महिने जुना आहे आणि तो राजकीय षडयंत्रांतर्गत व्हायरल करण्यात आला आहे. दरम्यान, बुलंदशहरचे एसपी (देहात) डॉ. तेजवीर सिंह यांनी सांगितले की व्हायरल व्हिडीओ त्यांच्या नजरेस आला आहे आणि याची चौकशी सुरू आहे. मात्र, आतापर्यंत यासंदर्भात कोणतीही लेखी तक्रार दाखल झालेली नाही आणि पोलिस व्हिडीओच्या आधारे ओळख पटवण्यात प्रयत्न करत आहेत.
