AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची गृहमंत्र्यांकडे मागणी

भाजपने बांग्लादेशच्या एका नागरिकाला उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे युवक जिल्हाध्यक्षपद दिले आहे. (BJP's bangladeshi youth leader arrested in malad, ncp wrote home minister)

भाजपच्या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची गृहमंत्र्यांकडे मागणी
| Updated on: Feb 17, 2021 | 2:35 PM
Share

मुंबई: भाजपने बांग्लादेशच्या एका नागरिकाला उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभागाचे युवक जिल्हाध्यक्षपद दिले आहे. पोलिसांच्या धाडीत हे उघड झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून भाजपच्या या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (BJP’s bangladeshi youth leader arrested in malad, ncp wrote home minister)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. एककीडे भाजपकडून त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. पण आता भाजपचे कार्यकर्तेच बांग्लादेशी असल्याचं उघड झालं आहे. बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत समोर आली आहे. याच तरुणाला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिल्याचे समोर आले आहे, याकडे महेश तपासे यांनी गृहमंत्र्यांचं लक्ष वेधलं आहे.

तर भाजप जबाबदारी घेणार का?

या युवकाने तयार केलेली त्याची सर्व कागदपत्रे ही बोगस असल्याचे सुध्दा उघड झाले आहे. देशद्रोहाची भाषा करणारे भाजपाचे नेते मात्र या प्रकरणात गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक बांधव भाजपला मानत नसून आता त्यांना बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची नामुष्की आलेली आहे. बेकायदेशीररित्या घुसखोरी करून मुंबईमध्ये राहणाऱ्या अशा भाजपच्या पदाधिकार्‍यांनी काही समाजविघातक कार्य केल्यास त्याची जबाबदारी भाजप घेणार का असा सवालही त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण

मालवणी पोलीस ठाण्याच्या दहतवाद विरोधी पथकाने मालाड मालवणीच्या आंबोजवाडी, आंबेडक चौक, गेट नं. 8 येथे धाड टाकून रुबेल जोनू शेख या 24 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं होतं. तो बांग्लादेशच्या जसूर जिल्ह्यातील बोवालिया गावचा रहिवासी असल्याचं उघड झालं. कोणत्याही कागदपत्राशिवाय त्याने 2011मध्ये भारतात प्रवेश करून मालाडमध्ये वास्तव्यास सुरुवात केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

शाळाच अस्तित्वात नाही

तो भाजपच्या उत्तर मुंबई अल्पसंख्याक युवकचा अध्यक्ष आहे. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता पश्चिम बंगालच्या मलापोटा येथील उत्तर परगणा ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला त्याच्याकडे आढळला. तसेच नादिया जिल्ह्यातील हंसाखाली येथील त्याचा जन्म दाखला आणि नादियातीलच आदर्श हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखलाही त्याच्याकडे आढळल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. मात्र मलापोटा ग्रामपंचायतीने शेखला कोणताही रहिवासाचा दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलं. तर त्याने ज्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे, ती शाळाच अस्तित्वात नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. त्याचे सर्व कागदपत्रे बनावट आढळल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात कलम 465, 467, 471, 34 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. (BJP’s bangladeshi youth leader arrested in malad, ncp wrote home minister)

संबंधित बातम्या:

15 दिवसांपूर्वी तुरुंगाबाहेर, पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळला पुन्हा अटक

टांगावाला ते आसाराम ‘बापू’; वाचा 400 ‘आश्रमा’च्या साम्राज्याची कहाणी!

वर्ध्यात बसस्थानकावर घोळक्यातून मोबाईल चोरणाऱ्या महिलेला अटक, 41 हजारांचे मोबाईल जप्त

(BJP’s bangladeshi youth leader arrested in malad, ncp wrote home minister)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.