AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोड्याच वेळात धमाके होतील… मुंबई एअरपोर्टवर धमकीचे 3 कॉल, यंत्रणा हादरली

शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टी२ टर्मिनल) बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्याने दावा केला की थोड्याच वेळात विमानतळावर स्फोट होणार आहे.

थोड्याच वेळात धमाके होतील... मुंबई एअरपोर्टवर धमकीचे 3 कॉल, यंत्रणा हादरली
मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकीImage Credit source: social media
| Updated on: Jul 26, 2025 | 12:04 PM
Share

शुक्रवारी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एकामागून एक तीन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, ज्यामुळे खळबळ उडाली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा कॉल करणाऱ्याने केल्याने एकच धावपळ उडाली. या कॉलनंतर, मुंबई पोलिसांचे पथक तत्काळ सतर्क झाले आणि पोलिस अधिकाऱी, तसेच बॉम्ब शोध पथकाने विमानतळ गाठलं. तासन्तास सखोल शोध घेऊन मोहीम राबवण्यात आली, मात्र एअरपोर्टवर कुठेही, काहीच संशयास्पद आढळले नाही.

पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 वर बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे उच्च अधिकारी आणि बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले. एअरपोर्टचा संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कोपऱ्याची, सखोल, बारकाईने तपासणी करण्यात आली. मात्र पोलिस व बॉम्बशोधक पथकाला कुठेच, काहीही संशयास्पद सापडलं नाही. त्यामुळे बॉम्बची ही केवळ अफवा असल्याचं दिसून आलं.

आसाम-बंगाल सीमेशी संबंधित धमकीच्या कॉल्सची मालिका

प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हे धमकीचे कॉल आसाम आणि पश्चिम बंगाल सीमेजवळ सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून केले गेले होते. मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात कॉलरविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सध्या, पोलिस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचे हेतू शोधता येतीलल यासाठी तपास सुरू आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच