AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boyfriend ची शुल्लक चूक, गर्लफ्रेंडने थेट डोळ्यात घातली सुई, तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं?

cime news : कोणाच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही. प्रेम करणं चांगली गोष्ट आहे पण तेच प्रेम जीवावर उठल्यासारखं होऊन जातं. ते पण एखाद्या शुल्लक कारणावरून अशा गोष्टी घडताना आपण ऐकतो. अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलं आहे.

Boyfriend ची शुल्लक चूक, गर्लफ्रेंडने थेट डोळ्यात घातली सुई, तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Dec 03, 2023 | 11:32 PM
Share

Crime : आजकाल बहुतेक रिलेशनशिप असे असतात ज्यामध्ये कपल्सचा एकमेकांवरती विश्वास नसतो. मग त्यांच्यामध्ये वाद विवाद होणे, एकमेकांवर अविश्वास दाखवणे अशा गोष्टी घडताना दिसतात. तर या वादामध्येच कपल्स एखादं टोकाचं पाऊल उचलताना दिसतात. आताही अशीच एक घटना घडली आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.  एका 44 वर्षीय महिलेने आपला प्रियकर इतर मुलींकडे पाहतो म्हणून त्याच्या डोळ्यात हायपोडर्मिक ‘रेबीज सुई’ने वार केला आहे.

अमेरिकेत राहणारी सँड्रा जिमेनेझ या महिलेने तिच्या प्रियकारावरती हल्ला केला आहे. तिचा प्रियकर इतर मुलींकडे पाहत होता या रागात तिनं हे कृत्य केलं आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिलेचा प्रियकर इतर मुलींना पाहत होता यामुळे त्या महिलेला खूप राग आला होता. त्यामुळे तिने तिच्या प्रियकरासोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यातील वाद इतका वाढला की तिने डायरेक्ट डोळ्यात सुईने हल्ला केला.

25 नोव्हेंबर रोजी सँड्रा जिमेनेझ आणि तिच्या प्रियकराचं भांडण झालं होतं. तिचा प्रियकर इतर मुली का पाहतो याबाबत तिने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्या दोघांमधील वाद इतका वाढला की रागाच्या भरामध्ये तिने प्रियकराच्या डोळ्यात सुईने वार केले. धक्कादायक म्हणजे ही सुई काही सामान्य नसून नसून ती रेबीची सुई होती. रेबीजची सुई सँड्रानं कुत्र्यासाठी आणली होती.

या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलं, सँड्राचा प्रियकर पलंगावर झोपायला गेला होता. त्यावेळी सँड्राने दोन रेबीच्या सुया घेतल्या आणि त्याच्या अंगावरती उडी मारली.  रागाच्या भरात तिने ती सुई तिच्या प्रियकराच्या उजव्या डोळ्यात खुपसली. यानंतर सँड्राने घाबरून तिथून पळ काढला. सध्या तिच्या प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी सँड्रावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान