हे नक्की प्रेम की फक्त वासना, शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून प्रेयसीला…

| Updated on: Jun 02, 2023 | 2:05 PM

प्रियकराचा वाढदिवस होता म्हणून जोडपं वांद्रे येथील बँड स्टँड परिसरात फिरायला आलं होतं. यावेळी प्रियकराने प्रेयसीकडे नको ती मागणी केली. प्रेयसीने नकार देताच प्रियकराचा विकृत चेहरा समोर आला.

हे नक्की प्रेम की फक्त वासना, शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून प्रेयसीला...
शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून प्रेयसीला मारण्याचा प्रयत्न
Follow us on

मुंबई : प्रेमाचं नातं हे सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण याच पवित्र प्रेमभावनेला कलंक लावणारी घटना मुंबईतील बँड स्टँड परिसरात घडली आहे. आजकाल प्रेम म्हणजे शारिरीक वासना असा अर्थ आजकालच्या तरुणाईने केलेला आहे. प्रेमाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी नको ते करताना अनेक जोडपी दिसतात. वांद्रे येथील बँड स्टँड परिसरात शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. तरुणीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत तिला वाचवले. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. आकाश मुखर्जी असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

दोघेही बँडस्टँडवर फिरायला आले होते

पीडित तरुणी भिवंडी येथील रहिवासी आहे, तरुण आरोपी कल्याणचा रहिवासी आहे. बुधवारी आकाशचा वाढदिवस होता. त्यानिमित्त दोघे वांद्रे येथे बँड स्टँड परिसरात सायंकाळी 5 वाजता फिरायला आले होते. रात्री 10 वाजता तरुणीने आकाशला तिला घरी जायचे असल्याचे सांगितले. यावेळी आकाशने प्रेयसीकडे शारीरिक सुखाची मागणी केली. आपली मागणी पूर्ण झाल्यानंतर तो तिला खाजगी वाहनाने घरी सोडेल असे त्याने तिला सांगितले. हे ऐकताच तरुणीला रडू कोसळले. तिने प्रियकराच्या या मागणीला नकार दिला.

हे सुद्धा वाचा

शारीरिक संबंधाला नकार दिला म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न

आकाशने तिचे तोंड दाबून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. या वादात तिने त्याच्या डाव्या हाताला चावा घेतला. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुखर्जीने तिचे डोके खडकावर आपटले आणि तिला बुडविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीचा आरडाओरडा ऐकून जमाव जमला. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती पडल्याने तिला दुखापत झाल्याचे सांगितले. मात्र तरुणीने सर्व हकीकत सांगताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी त्यांना पकडले. हा गोंधळ पाहून जवळचे काही पोलिस जमावाजवळ आले आणि त्यांनी मुखर्जीला ताब्यात घेतले.