AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुलच्या प्रेमात मृत्यू मिळाला, फक्त फोनकडे दुर्लक्ष करताच… कुठे सापडली बॉडी?

जबलपूरच्या देवताल डोंगरावर 19 वर्षीय लक्ष्मीची निर्घृण हत्या झाली. तिचा प्रियकर अब्दुल समद याने प्रेमातील वादानंतर तिचा गळा चिरून हत्या केली. लक्ष्मीच्या मोबाईल कॉल डिटेलच्या आधारे पोलिसांनी फक्त 48 तासात आरोपीला अटक केली. अब्दुल प्रयागराजहून लक्ष्मीला भेटायला आला होता आणि दोघांमध्ये वाद झाल्यावर त्याने हे कृत्य घडवलं.

अब्दुलच्या प्रेमात मृत्यू मिळाला, फक्त फोनकडे दुर्लक्ष करताच... कुठे सापडली बॉडी?
Crime JabalpurImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 12, 2025 | 9:21 PM
Share

मध्यप्रदेशातील जबलपूरच्या गढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवतालच्या डोंगरात 19 वर्षाच्या लक्ष्मी अहिरवारची भयंकर हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूर पद्धतीने झालेली ही हत्या पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. प्रेमात निर्माण झालेला वाद इतका टोकाला पोहोचेल हे कुणालाही वाटलं नव्हतं. प्रयागराजहून जबलपूरला आलेल्या अब्दुल समद या प्रियकराने त्याची प्रेयसी लक्ष्मीचा गळा चिरून हत्या केली. लक्ष्मी त्याच्या कॉल्सकडे दुर्लक्ष करत होती, म्हणून त्याने हे कृत्य केलं. पोलिसांनी 48 तासात या ब्लाइंड मर्डरचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे.

लक्ष्मी ही छतरपूर जिल्ह्यातील खजुराहो येथील राहणारी आहे. ती कुटुंबासोबत जबलपूरला आलो होती. देवताल येथील एका प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी मजुरी करत होती. शनिवारी ती शौचासाठी देवताल डोंगराच्या दिशेने गेली होती. पण बराच वेळ झाला तरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. तब्बल एक तासाच्या शोधानंतर तिच्या भावाला आणि वहिनीला रक्ताच्या थारोळ्यातील तिचा मृतदेह झुडूपांमध्ये सापडला. तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूचे खोल घाव होते. वाचा: एकत्र फिरले, नूडल्स-आईस्क्रीम खाल्ले; शारीरिक संबंधानंतर बॉयफ्रेंडनेच जे केलं ते पाहून पोलिसांनाही बसला धक्का

कॉलवरून छडा लागला

या घटनेची माहिती मिळताच गढा पोलीस ठाण्याचे पोलीस एफएसएल आणि डॉग स्क्वॉडच्या टीमला घेऊन घटनास्थळी पोहोचली. प्रारंभिक तपासात हे प्रकरण ब्लाइंड मर्डर सारखं होतं. कारण हत्या दिवसाढवळ्या झाली होती. कोणीही साक्षीदार नव्हता. पण घटनास्थळी लक्ष्मीचा मोबाईल सापडला आणि पोलिसांना तपासाची दिशा सापडली. मोबाईलची कॉल डिटेल काढल्यावर हत्याच्या आधी लक्ष्मीचं प्रयागराज येथील अब्दुल समद यांच्यासोबत बोलणं झाल्याचं आढळून आलं.

प्रेयसीला भेटायला आला होता

अब्दुल जबलपूरलाच होता. माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी प्रयागराजहून जबलपूरला आला होता. त्याने आल्यावर लक्ष्मीला अनेकवेळा फोन केले. एकदा कॉल रिसिव्ह केल्यानंतर लक्ष्मीने त्याला देवताल डोंगरात दुपारी 12 वाजता भेटायला बोलावलं. डोंगरावर आल्यावर लक्ष्मीला पाहताच अब्दुलचा पारा चढला. त्यानंतर दोघांचे वाद झाले. अब्दुलने लक्ष्मीला मोबाईल दिला होता. पण लक्ष्मी त्या मोबाईलवरून दुसऱ्याशीच बोलायची यावरून अब्दुल तिच्याशी भांडत होता.

गळा चिरून हत्या

लक्ष्मी अब्दुलकडे दुर्लक्ष करत होती. वाद वाढल्याने तिने विरोध केला आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या अब्दुलने चाकू काढला आणि तिचा गळाच चिरला. त्यानंतर तिच्या पोटावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून त्याने पळ काढला. त्यानंतर तो शहरातील एका हॉटेलात दोन दिवस लपला. लोकेशनही बदल होता. तो नागपूरला पळून जाण्याच्या तयारीत होता. पण रविवारी रात्री अंधमूक बायपासजवळ बसची वाट पाहत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपींचा अड्डा

देवताल डोंगर हा आरोपी आणि नशेड्डींचा अड्डा मानला जातो. या ठिकाणी पूर्वी अशाच गुन्हेगारी घटना झालेल्या आहेत. पण या हत्येने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...