पुण्यातील घटना | पतीने पत्नीवर संशय आला, त्याने थेट पत्नीला बेडरुमध्ये पलंगाला बांधलं, एवढंच नाही…

ती आपल्या मुलीचा मोबाईल हातात घेऊन पाहत होती. पण पतीला नेमकं तेच खटकलं. मग बेडरुममध्ये जे घडलं त्याची कुणी कल्पनाच केली नसेल.

पुण्यातील घटना | पतीने पत्नीवर संशय आला, त्याने थेट पत्नीला बेडरुमध्ये पलंगाला बांधलं, एवढंच नाही...
चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा अमानुष छळ
Image Credit source: TV9
| Updated on: May 04, 2023 | 4:48 PM

अभिजीत पोते, TV9 मराठी, पुणे : सांस्कृतिक शहर आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीच्या चारित्र्यावर संशय असेलल्या संशयातून पतीने पत्नीला नरक यातना दिल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरुन पतीविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिलेसोबत जे घडले ते ऐकून पोलीसही चक्रावले आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, त्याची सखोल चौकशी करत आहेत. पतीच्या कृत्यामुळे त्याच्या चार मुलांना धक्का बसला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित महिला आणि आरोपीला चार मुलं आहेत. महिला आपल्या 16 वर्षाच्या मुलीचा मोबाईल हातात घेऊन पाहत होती. पतीने हे पाहिले आणि त्याच्या मनात संशय निर्माण झाला. पतीला वाटले महिला कुणासोबत तरी बोलत आहे. याच संशयातून त्याने पत्नीला ओढून बेडरुममध्ये नेले. यानंतर पत्नीला ओढणीच्या सहाय्याने बेडला बांधले. मग गरम हिटरने तिच्या अंगावर आणि गुप्तांगावर चटके दिले. नराधम पती एवढ्यावरच थांबला नाही. त्यानंतर हातपाय बांधून पत्नीशी क्रूर पद्धतीने शरीरसंबंध ठेवले. तसेच पीडितेच्या डोक्यात, हाता-पायावर खलबत्त्याने मारहाण केली.

वडिलांच्या या कृत्यामुळे चारही मुले घाबरुन गेली. यानंतर कशीबशी सुटका झाल्यानंतर महिलेने कोंढवा पोलीस ठाणे गाठत पोलिसांना आपबीती सांगितली. यानंतर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करत, त्याला अटक केली. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. मात्र पतीच्या संशयी वृत्तीमुळे संपूर्ण कुटुंबाची वाताहत झाली आहे.