बुलडाण्यात एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीरचे डोस, लाईफलाईन हॉस्पिटल सील

बुलडाण्यात एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीरचे डोस, लाईफलाईन हॉस्पिटल सील
बुलडाण्यात एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीरचे डोस, लाईफलाईन हॉस्पिटल सील

बुलडाण्यात लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये एकाच रुग्णाला तब्बल 14 डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Buldhana District collector order to sealed lifeline hospital).

गणेश सोळंकी

| Edited By: चेतन पाटील

Jun 30, 2021 | 6:03 PM

बुलडाणा : कोरोना रुग्णांवर उपचार करण्याबाबत केंद्र सरकारने काही नियमावली आखली आहे. मात्र, या नियमांचं उल्लंघन करत थेट एकाच रुग्णाला 14 रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात समोर आला आहे. संबंधित प्रकार हा खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. लाईफलाईन रुग्णालय सील करुन पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी दिले आहेत. संबंधित घटना उघड झाल्यानंतर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे (Buldhana District collector order to sealed lifeline hospital).

जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी न घेता कोरोनाबाधितांवर उपचार

कोणत्याही रुग्णालयाला कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी जिल्ह्याचे शल्य चिकित्सक यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं. मात्र, बुलडाण्यातील खामगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी न घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. याबाबतची तक्रार प्रशासनाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार शीतल रसाळ यांनी खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांना तात्काळ चौकशी समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अहवाल स्थापन करण्यात आला आहे (Buldhana District collector order to sealed lifeline hospital).

रुग्णालय सील करण्याचे आदेश

संबंधित समितीने चौकशी केली असता अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. यामधील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे एकाच रुग्णाला तब्बल 14 रेमडेसिवीर इंजेक्शनचे डोस देण्यात आले होते. या समितीने संपूर्ण अहवाल जिल्हाधिरी एस राममूर्ती यांच्यासमोर सादर केला. त्यांनी संपूर्ण अहवालाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लाईफलाईन रुग्णालय सील करण्याचे निर्देश दिले. तसेच पोलिसातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : 

VIDEO : बुलडाण्यात कोविड सेंटरमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

प्रेम केलं, पण पाच निरापराध कुटुबियांना जमिनीत गाडलं, गुंतागुंतीचं प्रकरण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें