बुलडाणा : बुलडाण्यात एका कोविड सेंटरमध्ये पोलिसानेच मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातल्याचा विचित्र आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बुलडाणा शहरातील अपंग निवासी विद्यालय कोविड सेंटरमध्ये संबंधित प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तसेच संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बघितल्यानंतर सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसाचे मद्यधुंद अवस्थेत अशाप्रकारे दमदाटी करणे प्रचंड किळसवाणं असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून दिली जात आहेत (Drunk policeman misbehave at covid centre in Buldhana).