काळी-पिवळी चालकांकडून पैसे घेणारा वाहतूक पोलीस कर्मचारी अखेर निलंबित, वाचा संपूर्ण प्रकरण

सोशल मीडियावर बुलडाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक वाहतूक पोलीस काळी-पिवळी चालकांकडून हप्ता घेत असल्याचं समोर आलं होतं (Buldhana traffic police man suspend who take money from vehicle drivers).

काळी-पिवळी चालकांकडून पैसे घेणारा वाहतूक पोलीस कर्मचारी अखेर निलंबित, वाचा संपूर्ण प्रकरण
काळी-पिवळी चालकांकडून पैसे घेणारा वाहतूक पोलीस कर्मचारी अखेर निलंबित
गणेश सोळंकी

| Edited By: चेतन पाटील

Jun 16, 2021 | 4:15 PM

बुलडाणा : सोशल मीडियावर बुलडाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक वाहतूक पोलीस काळी-पिवळी चालकांकडून हप्ता घेत असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे बुलडाण्या पोलिसांची छवी मलिन झाली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव राजू चौधरी असं आहे. त्याची बुलडाणा येथील मुख्यालयात रवानगी करण्यात आलीय. तसेच या प्रकरणाची चौकशी देऊळगावराजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्याकडे देण्यात आली आहे (Buldhana traffic police man suspend who take money from vehicle drivers).

नेमकं प्रकरण काय?

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली ते देऊळगाव राजा या रस्त्यावर अनेक काळी-पिवळी चालक प्रवासी घेऊन जाण्याचा व्यवसाय करतात. या काळी-पिवळी चालकांना अंढेरा पोलीस ठाण्याची हद्द पार करावी लागते. अंढेरा फाट्याजवळ अंढेरा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस नेहमी वाहनधारकांना त्रास देत असल्याच्या तोंडी तक्रार होत्या, तर काळी-पिवळी चालकांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी दरमहा हप्त्याची वसुली करण्यात येत असल्याचीही चर्चा होती (Buldhana traffic police man suspend who take money from vehicle drivers).

कोरोनामुळे सध्या काळी-पिवळी वाहनधारकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तरीही पोलीस त्यांच्याकडून हफ्ता वसूल करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हफ्ता वसुलीला कंटाळून एका काळी-पिवळी चालकाने कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला 250 रुपये हफ्त्याची रक्कम दिल्याचा व्हिडिओ तयार केला आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाहतूक पोलिसावर कारवाई

वाहतूक पोलीस कर्मचारी राजू चौधरी याने काळी-पिवळी चालकाकडून 500 रुपयांची मागणी केली होती. काळी-पिवळी चालकाने 250 रुपये घेण्याची विनवणी केली. त्यानंतर अखेर राजू चौधरीने पैसे घेतले. हा सगळा प्रकार काळी-पिवळी चालकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात अचूकपणे कैद केला. संबंधित व्हिडीओत पोलीस पैसे घेताना स्पष्टपणे दिसत आहे. याशिवाय या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही असल्याचे व्हिडिमध्ये दिसत आहे. याबाबतची गंभीर दखल घेत वाहतूक पोलीस राजू चौधरी यांना जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया यांनी जिल्ह्यात पोलिसांची प्रतिमा मालिन झाल्याप्रकरणी निलंबित केलं.

हेही वाचा : आईचा ओरडण्याचा राग, अल्पवयीन मुलीने घर सोडलं, एका रिक्षाचालकाचा आसरा देण्याचा बहाणा, सहा जणांकडून सामूहिक बलात्कार

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें