Badlapur Theft : बदलापुरात चोरट्यांचा ‘रात्रीस खेळ चाले!’, कात्रप परिसरात चोरट्यांकडून घरफोडी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

चोरटे तिथून पळून जात असतानाच वॉचमनला त्यांची चाहूल लागली. त्यामुळं वॉचमनने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या चोरट्यांनी वॉचमनच्या अंगावर दगडं फेकून मारत तिथून पळ काढला.

Badlapur Theft : बदलापुरात चोरट्यांचा 'रात्रीस खेळ चाले!', कात्रप परिसरात चोरट्यांकडून घरफोडी, चोरटे सीसीटीव्हीत कैद
बदलापुरात कात्रप परिसरात चोरट्यांकडून घरफोडीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 1:18 AM

बदलापूर : बदलापुरात चोरट्यांचा रात्रीस खेळ सुरू असल्याचं समोर आलं आहे. कात्रप परिसरात एका सोसायटीत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी (Theft) केल्यानंतर चोरट्यांनी इमारतीच्या वॉचमन (Watchmen)ला दगडं मारत तिथून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. चोरटे घरातील मुद्देमाल घेऊन पसार होत असतानाच वॉचमनने त्यांना पाहिले आणि पकडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.

वॉचमनने पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी दगड मारले

बदलापूर पूर्वेच्या कात्रप परिसरात शुभ निसर्ग नावाची सोसायटी आहे. या सोसायटीत 25 जुलैच्या पहाटे 3 वाजता 5 चोरटे अंगावर चादरी घेऊन घुसले. त्यांनी ई विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या हिमांशु उदेशी यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून त्यांच्या घरात प्रवेश केला. तिथे त्यांनी 2 सोन्याच्या चेन, 6 लॉकेट, 2 ब्रेसलेट, 4 कानातले, 2 पैंजण, 4 चांदीचे कडे, 5 चांदीचे शिक्के, 1 चांदीचा पेला आणि 1 चांदीची ताटली असा मुद्देमाल चोरला. यानंतर हे चोरटे तिथून पळून जात असतानाच वॉचमनला त्यांची चाहूल लागली. त्यामुळं वॉचमनने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या चोरट्यांनी वॉचमनच्या अंगावर दगडं फेकून मारत तिथून पळ काढला. हा सगळा प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

नांदेडच्या पाहुण्याकडून उल्हासनगरात सहा घरफोड्या

भाचीच्या वाढदिवसासाठी नांदेडहून अंबरनाथला आलेल्या मामाने उल्हासनगरात सहा घरफोड्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजू मिरे असे या आरोपीचे नाव आहे. घरफोडी प्रकरणी हिललाईन पोलिसांनी राजू मिरेसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. तर अन्य दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परमेश्वर गायकवाड आणि प्रकाश पवार अशी अटक केलेल्या अन्य दोन आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल असा एकूण 12 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. (Burglary in Katrap area in Badlapur, thieves caught on CCTV)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.