AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident News : नवी मुंबईत बसची स्कूटीला धडक, मुलाचा जागीच मृत्यू

याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बसचालक शिव कैलास रामेश्वर यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News : नवी मुंबईत बसची स्कूटीला धडक, मुलाचा जागीच मृत्यू
crime-2Image Credit source: socialmedia
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 09, 2023 | 9:21 AM
Share

रवी खरात, नवी मुंबई : बसने स्कुटीला (Bus Scooty accident) पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पनवेल येथे घडली असून या प्रकरणी पोलिसांनी (navi mumbai police) बस चालकावरती गुन्हा दाखल केला आहे. मुलाचा जागीच मृत्यू झाल्याने अपघात पाहणाऱ्या लोकांनी ही माहिती पोलिसांना कळवली. मुलाच्या अंगावरुन बसचे चाक गेल्यामुळे त्याचा जागीचं मृ्त्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (deadbody) जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

बसने त्याच्या स्कूटीला जोराची धडक मारली

रिषवराज जीवेश झा असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. मागून आलेल्या बसने त्याच्या स्कूटीला जोराची धडक मारली. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याचवेळी बसचं चाक त्यांच्या अंगावरुन गेलं असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर काही वेळात पोलिसांचा ताफा तिथं दाखल झाला. पोलिसांनी परिस्थिती पाहिल्यानंतर तिथल्या काही प्रवाशांची चर्चा केली.

नवीन पनवेल फूड कोर्ट हॉटेल समोरील…

त्यानंतर मुलाचा मृतदेह जवळच्या रुग्णालयात शासकीय शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बसचालक शिव कैलास रामेश्वर यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन पनवेल फूड कोर्ट हॉटेल समोरील रस्त्यावर सेक्टर 11 येथे स्कुटीला पाठीमागून मारल्यामुळे हा अपघात झाला आहे.

बस चाचणी करण्यात येणार…

अपघाताची बातमी मुलाच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. बस चाचणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बसच्या चालकाची सुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?