
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandraopur) सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यातल्या शिवणी वनपरिक्षेत्रात वनविभागाने (Forest Department) वाघीनीला जेरबंद केलं. वाघीणीचं वय तीन ते चार वर्षे होतं. वाघिणीने चारगाव येथील 19 वर्षीय युवकाला ठार केले होते. वनविभागाने यासाठी मोहीम राबवून डार्ट मारत वाघाला केले जेरबंद केले.
वाघीणीने कुकडहेटी परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याचबरोबर वाघिणीने युवकाला ठार केल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. वाघीण जेरबंद झाल्यानंतर वनविभाग व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
आतापर्यंत राज्यात वाघांनी अनेक ठिकाणी मानवी वस्तीवर हल्ले केले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी वाघांना पकडणं देखील वन विभागासाठी अवघड झालं आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून वाघीणीला पकडण्याठी वनविभाग शर्तीचे प्रयत्न करीत होतं. परंतु त्याला नुकतच यश आलं आहे. ग्रामस्थ आणि तिथ राहणारी लोकं वाघीणीच्या दहशतीमुळे बाहेर जाण्यास घाबरत होती.