लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरी मुलीने असा खेळ केला, आधी दुधाने भरलेला ग्लास दिला, मग…
लग्न म्हणजे दोन कुटुंबाच मिलन. लग्न करताना डोळ्यात हजारो स्वप्न साठवलेली असतात. पण एका विवाहात लग्नाच्या पहिल्या रात्रीच नव्या नवरीने असं काही केलं की, नवरदेवासह सगळेच हैराण झालेत.

मोठ्या अपेक्षांनी, डोळ्यात अनेक स्वप्न साठवून नवरदेव नवरी मुलीला लग्न करुन घरी घेऊन आला. गृह प्रवेशाचा विधी झाल्यानंतर दोघे रात्री झोपण्यासाठी निघून गेले. लग्नाची पहिली रात्र असल्याने नवरीने नवरदेवाला दूधाने भरलेला ग्लास दिला. हे दूध पिल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी डोळे उघडले, तेव्हा नवरी मुलगी रुममध्ये नव्हती. नशा असलेलं दूध प्याल्यामुळे नवरदेवाची तब्येत बिघडली. नातेवाईकांना त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. दूध पिल्यानंतर नवरदेवाची शुद्धच हरपली. मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील हे प्रकरण आहे.
नौगाव पोलीस ठाणे क्षेत्रातील कुलवारा गावातील हे प्रकरण आहे. लग्नानंतर 24 तासांच्या आत नवरी मुलगी फरार झाली. तिने पतीच्या दूधात नशेचा पदार्थ मिसळलेला. लाखो रुपयाचे दागिने घेऊन ती पसार झाली. या घटनेनंतर नवरदेवाची तब्येत बिघडली आहे. त्याला धक्का बसलाय. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हिंदू रितीरिवाजाने लग्न
पीडित युवकाच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लुटारु नवरी, तिचा भाऊ आणि मित्रासह चौघांविरोधात गुन्हा नोंदवलाय. चारही आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी सांगितलं की, अशोक रावत यांचा 29 वर्षीय मुलगा राजदीप रावतच लग्न चरखारी येथे रहाणाऱ्या खुशी तिवारीसोबत 11 डिसेंबरला हिंदू रितीरिवाजाने झालं.
दुधाने भरलेला ग्लास दिला
लग्नामध्ये मुलीचा भाऊ छोटू तिवारी, त्याचा मित्र विनय तिवारीसह अन्य लोक सहभागी झाले. 12 डिसेंबरला लग्नाची पहिली रात्र हनिमून होता. नवरीने नवरा राजदीप रावतला दुधाने भरलेला ग्लास दिला. दूध पिताच राजदीपला गुंगी आली, तो झोपून गेला, त्यानंतर नवरी मुलगी लग्नाचे सगळे दागिने व नणदेचे दागिने घेऊन पसार झाली. युवकाला शुद्ध आली, तेव्हा समजलं की पत्नी गायब आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर समजलं की, तिने दुधात गुंगीच औषध मिसळलं होतं.
कोणी जुळवलेलं लग्न?
पीडित युवकाच्या वडिलांनी सांगितलं की, नौगांवा गावातील शकुन पाठक यांनी हे लग्न जुळवलं होतं. लग्नाच्या 17 दिवस आधी पप्पू राजपूत आणि शकुन पाठक यांनी चरखारीच्या हनुमान मंदिरात मुलगी दाखवली होती. खुशी तिवारीसोबत तिचा भाऊ छोटू तिवारी आणि मित्र विनय तिवारी सोबत आले होते.
