AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घातपाताची लागली होती चाहूल, तरी…महिला कीर्तनकाराला डोक्यात दगड घालून संपवले; संभाजीनगर हादरले!

छत्रपती संभाजीनगरात मोठी धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिला कीर्तनकाराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

घातपाताची लागली होती चाहूल, तरी...महिला कीर्तनकाराला डोक्यात दगड घालून संपवले; संभाजीनगर हादरले!
chhatrapati sambhajinagar mahila kirtankar murder case
| Updated on: Jun 28, 2025 | 8:25 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : एका महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी साडे सहावाजेच्या हत्येची ही घटना उघडकीस आली. या हत्याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृत महिला कीर्तनकाराचे नाव संगीताताई अण्णासाहेब पवार (वय 50 वर्षे) असे आहे.

पूजारी पूजेसाठी गेले, अन्..

हत्या झालेल्या संगीताताई चिंचडगाव येथील रहिवासी होत्या. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितींनुसार हभप संगीताताई पवार या चिंचडगाव येथील सदगुरू नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे रहिवासास होत्या. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पूजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आले होते. त्यांनी हभप संगीताताई पवार यांना आवाज दिला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिरा शेजारी असलेल्या शेडमध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.

फॉरेन्सिक टीमला पाचारणही करण्यात आले

ही घटना समोर आल्यानंतर लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही लगेच घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. श्वान पथक, फॉरेन्सिक टीमला पाचारणही करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन तपासला गती दिली. संगीताताई यांची हत्या नेमकी कोणी केली? याचा शोध घेतला जात आहे.

देवीच्या अंगावरचे अलंकार तसेच, पण…

मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे संगीताताई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळण्याने अनेक शंकाना पेव फुटले आहे.दुसरीकडे मंदिराच्या दानपेटीचे कुलूप तुटलेल्या स्थितीत आढळले आहे.मात्र देवीच्या अंगावर असलेले अलंकार तसेच आहेत. ही सर्व स्थिती पाहून चोरीच्या दृष्टिकोनाने कोणी आले होते का? याचाही पोलीस करत आहेत. तसेच मृत कीर्तनकार यांचा कोणासोबत वाद होता का? याचाही तपास केला जात आहे.

माझी हत्या होऊ शकते, दिली होती तक्रार

सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे माझी हत्या होऊ शकते, अशी तक्रार कीर्तनकार संगीताताई यांनी केली होती. ही तक्रार एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. ही तक्रार देऊनही मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. याच कारणामुळे तेथील लोकांत संताप व्यक्त केला जात आहे.

दोन संशयित ताब्यात

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. अद्याप तरी हा खून नेमका कोणी केला? याचे उत्तर सापडू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.