CRPF Jawan Firing | छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर

| Updated on: Nov 08, 2021 | 9:23 AM

सुकमातील मराईगुडा ठाणा क्षेत्रातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये ही फायरिंग झाल्याची माहिती आहे. यात सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या चार जवानांचा मृत्यू झाला. गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

CRPF Jawan Firing | छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर
छत्तीसगडमध्ये जवानाचा गोळीबार
Follow us on

CRPF Jawan Firing : छत्तीसगडमधील सुकमा येथे एका सीआरपीएफ जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चार जवानांना प्राण गमवावे लागले, तर 3 जवान गंभीर जखमी झाले आहेत. सुकमातील मराईगुडा ठाणा क्षेत्रातील सीआरपीएफ कॅम्पमध्ये गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. यात सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनमधील चौघा जवानांचा मृत्यू झाला. मात्र गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं?

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात निमलष्करी दलाच्या छावणीत सोमवारी सहकाऱ्याने गोळ्या झाडल्यामुळे चार सीआरपीएफ जवान गतप्राण झाले, तर तिघे जण जखमी झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. राजधानी रायपूरपासून 400 किमी अंतरावर असलेल्या लिंगमपल्ली गावात सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर श्रेणी) सुंदरराज पी यांनी सांगितले.

आरोपी जवान ताब्यात

प्राथमिक माहितीनुसार, जवानाने त्याच्या एके-47 रायफलमधून आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. आरोपी जवानाला तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जखमी जवानांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या :

श्रीनगरमध्ये 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

चेटकीण असल्याचे सांगत आधी महिलांना मारहाण, नंतर शरीराचे मांस काढून खाल्ले

माळशिरसमध्ये बेकायदेशीररित्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन; एका रेड्याचा मृत्यू