AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

रात्री आठच्या सुमारास, पोलिसच कॉन्स्टेबल तौसिफ अहमद यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारासाठी एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Jammu Kashmir: श्रीनगरमध्ये 29 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या
Representative Image
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 10:46 PM
Share

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी संध्याकाळी एका 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफ अहमद असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, ही घटना श्रीनगरमधील बटमालू भागात घडली. परिसराचात नाकाबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. (29 year old Jammu Kashmir policeman killed by terrorists in Shrinagar)

अधिकाऱ्यांनी सांगितले, रात्री आठच्या सुमारास, एसडी कॉलनी, बटामालू येथील जम्मू आणि काश्मीर पोलिसचे कॉन्स्टेबल तौसिफ अहमद यांच्या घराजवळ दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पोलीस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि उपचारासाठी एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने (NC) या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले, श्रीनगरच्या बाटमालू येथे 29 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही स्पष्टपणे निषेध करतो. निंदा करायला शब्द पुरेसे ​​नाहीत.

यापूर्वी, ऑक्टोबरमध्ये काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 11 नागरिकांची हत्या केली होती. ज्यामध्ये एका शिक्षकाचा, इतर राज्यातील मजूरांचा आणि दुकानदारांचा समावेश होता.

रविवारी शोपियान जिल्ह्यातील रुग्णालयातून ‘द रेझिस्टन्स फ्रंट’च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, टीआरएफचा सक्रिय दहशतवादी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोहेल अहमद लोन असे या दहशतवाद्याचे नाव असून तो शोपियानच्या हरमेन भागातील रहिवासी आहे. दहशतवाद्याच्या मानेवर गोळीचा घाव आहे. त्याच्या ही दुखाप कशी झाली त्याचा पोलीस तपास करत आहेत.

Other News

जम्मू-काश्मीरमध्ये दशहतवाद्यांविरोधात शोध मोहीम; सर्च ऑपरेशनचा 27 वा दिवस, आतापर्यंत 9 जवान शहीद

Air Pollution: दिल्ली ‘डार्क रेड झोन’ मध्ये; “दिल्लीत कोरोनापेक्षा वायू प्रदूषणामुळे जास्त मृत्यू झाले”- डॉ अरविंद कुमार

झारखंडमध्ये अंधश्रद्धेचा कळस! चेटकीण असल्याचे सांगत आधी महिलांना मारहाण, नंतर शरीराचे मांस काढून खाल्ले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.