एका रात्रीत असं काय घडलं बायकोचा मृत्यू झाला… नवरा आणि सासऱ्याला अटक… खळबळजनक वास्तव समोर

Crime : 'ती' रात्र बायकोसाठी ठरली धोक्याची, शेवटच्या क्षणी काय करत होती बायको, मृत्यूचं कारण समोर, नवरा आणि सासऱ्याला अटक, खळबळजनक वास्तव समोर... प्रकरणाची सर्वत्र चर्चा...

एका रात्रीत असं काय घडलं बायकोचा मृत्यू झाला... नवरा आणि सासऱ्याला अटक... खळबळजनक वास्तव समोर
फाईल फोटो
| Updated on: Oct 31, 2025 | 10:59 AM

Crime : नवरा – बायको मध्ये छोट्या – मोठ्या कारणांमुळे सतत वाद होत असतात. पण हे वाद कधी टोकाला पोहोचतील सांगता येत नाही. आता देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. रात्री नवरा बायकोमध्ये वाद झाले आणि सकाळी महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी तिच्या आई – वडिलांना दिली… ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली… याप्रकरणी महिलेच्या आई – वडिलांना मुलीचा पती आणि सासऱ्याला अटक केली… सध्या याप्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत.

नवरा – बायकोमध्ये का झाले वाद

रात्री झोपण्यापूर्वी बायको फेसबूकवर ऑनलाईन होती आणि नवरा तिला फोन बंद करण्यास सांगत होते. फेसबूकवरून सुरु झालेले वाद अखेर टोकाला पोहोचले. नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. सकाळी महिलेच्या मृत्यूबद्दल सर्वांना कळल्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली… अखेर पोलिसांनी महिलेचा पती आणि सासऱ्याला अटक केला आहे.

संबंधित घटना बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस स्टेशन परिसरातील एराजीकंचनपूर गावात घडली आहे. मुलीच्या पालकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिदुपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच, बिदुपूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विवाहित महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी सदर रुग्णालय हाजीपूर येथे पाठवला. आरोपी पती अभिषेक कुमार उर्फ ​​राजा आणि त्याचे वडील रवी रंजन उर्फ ​​बबलू यांना अटक करण्यात आली आहे. अभिषेक कुमार उर्फ ​​राजा यांचा गुन्हेगारी इतिहास आहे.

पोलिसांनी सांगितलं धक्कादायक वास्तव

याप्रकरणी, एसडीपीओ फॉरेस्ट सुबोध कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी बिदुपूर पोलिस स्टेशन परिसरातील एराजीकंचनपूर गावात एका विवाहित महिलेची तिच्या सासरच्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती आणि सासऱ्याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान घटनेचा क्रम समोर आला आहे.

विवाहित महिला रात्री फेसबूकवर ऑनलाईन होती. त्यामुळे रात्री तिची मारहाण करण्यात आली आणि गळा दाबून महिलेची हत्या करण्यात आली. अभिषेक कुमार गुन्हेगारी विश्वात सक्रिय असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे, एवढंच नाही तर, बलात्काराचाही गुन्हा दाखल आहे.