महिला डॉक्टर घाबरलेल्या, त्यांची गाडी देखील…, ‘त्या’ संध्याकाळी हॉटेलमध्ये नक्की काय झालं? धक्कादायक माहिती समोर
Satara Phaltan Doctor Death Case: 23 ऑक्टोबर आणि संध्याकाळी 5 वा. नंतर...., 'त्या' काही तासांत कशी होती महिला डॉक्टरांची अवस्था, प्रचंड घाबरलेल्या होत्या आणि त्यांची गाडी देखील..., प्रकरणामुळे सर्वत्र माजली आहे खळबळ...

Satara Phaltan Doctor Death Case: हॉटेलमध्ये येताना महिला डॉक्टर प्रचंड घाबरलेल्या परिस्थित होत्या आणि त्याची गाडी देखील व्यवस्थित पार्क केलेली नव्हाती, त्यांना गाडी पार्क देखील करता आली नाही… अशी माहिती हॉटेल मधुदीपचे मालक दिलीप भोसले पत्रकार परिषदेत दिली आहेत. शिवाय ही हत्या नसून आत्महत्याच आहे… असं देखील दिलीप भोसले म्हणाले. त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या हत्येच्या आरोपाचे त्यांनी खंडन केलं. सांगायचं झालं तर, डॉक्टर महिला प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
काय म्हणाले हॉटेलचे मालक दिलीप भोसले?
पत्रकार परिषदेत दिलीप भोसले यांनी 23 ऑक्टोरबर रोजी घडलेला क्रम सांगितला. ‘डॉक्टर महिला यांनी 2 दिवसांसाठी हॉटेलमध्ये खोली बूक केली होती. 23 ऑक्टोबर रोजी त्या मध्यरात्री रात्री दीड वाजता रुमवर आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना फोन करण्यात आला, तोपर्यंत त्या ठिक होत्या. पण संध्याकाळी 5 वाजेनंतर त्यांच्या रुममधून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.’
‘त्यांनी दार उघडला नाही तेव्हा संशय आला आणि रुमचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा कळलं की, त्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवलं आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं… आम्ही तपासात पूर्ण सहकार्य केलं आहे…’ असं देखील दिलीप भोसले म्हणाले.
घाबरलेल्या होत्या डॉक्टर महिला
पोलिसांना प्राप्त झालेल्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजबद्दल देखील दिलीप भोसले यांनी सांगितलं आहे. ‘हॉटेलमध्ये येताना महिला डॉक्टर घाबरलेल्या परिस्थितीत होत्या. तेव्हा त्या एकट्याच होत्या की त्यांच्यासोबत इतर कोणी होतं… याचा तपास सध्या सुरु आहे… त्यांना स्वतःची गाडी देखील व्यवस्थित पार्क करता आली नव्हती. अशात हॉटेलच्या वॉचमॅनने त्यांची गाडी नीट लावली…’ असं देखील दिलीप भोसले म्हणाले.
जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे – दिलीप भोसले
‘मी गेल्या 30 – 35 वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे. त्यामुळे विरोधक जाणूनबुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत… त्यामुळे डॉक्टर महिलेची हत्या नसून आत्महत्याच आहे…’ असं देखील दिलीप भोसले म्हणाले आहेत… सांगायचं झालं तर, पोलीस डॉक्टर महिला आत्महत्ये प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
