AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 वर्षीय मुलासोबत विवाहितेचं नको ते कृत्य, हॉटेलमध्ये बोलावलं आणि…, इन्स्टा फ्रेंडशीप पडली महागात, नेमकं घडलं तरी काय?

विवाहित महिलेने 16 वर्षीय मुलासोबत असं काय केलं, घाबरलेल्या मुलाने घेतली पोलिसांची मदत, मुलाला हॉटेलमध्ये बोलावून महिलेनं केलं तरी काय... इन्स्टा फ्रेंडशीप पडली महागात, नेमकं घडलं तरी...

16 वर्षीय मुलासोबत विवाहितेचं नको ते कृत्य,  हॉटेलमध्ये बोलावलं आणि..., इन्स्टा फ्रेंडशीप पडली महागात, नेमकं घडलं तरी काय?
| Updated on: Apr 05, 2026 | 11:49 AM
Share

एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ज्यामध्ये एका 25 वर्षीय विवाहित महिलेने 16 वर्षीय मुलाला हॉटेलमध्ये बोलावलं आणि त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं आहे. याप्रकरणी मुलाने महिलेविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलगा आणि 25 वर्षीय महिला यांची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर झालेली. मैत्री झाल्यानंतर महिलेने मुलाला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं आणि त्याच्यासोबत बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर, अल्पवयीन पीडित मुलाने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

पीडित मुलाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेचं नाव ख्याती विश्वकर्मा असं असून ती 26 वर्षांची आहे.. सोशल मीडियाच्या माध्यामातून पीडित आणि महिलेची ओळख झाली आणि हळू – हळू दोघांमध्ये गप्पा देखील वाढू लागल्या… त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू देखील लागले.

त्यानंतर 1 एप्रिल 2026 रोजी ख्याती विश्वकर्मा हिने मुलाला एका हॉटेलमध्ये बोलावलं. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर, महिलेने मुलावर भावनात्मक दबाव टाकला आणि आमिष दाखवत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर महिलेने त्याला या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. यामुळे अल्पवयीन मुलगा मानसिक दबावाखाली आला.

महिलेच्या दबावात असलेला महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करु शकत नव्हता. पण घडलेल्या घटनेच्या दोन दिवसांनंतर मुलगा पोलीस स्थानकात पोहोचला आणि महिलेच्या विरोधात तक्रार दाखल कोला… अशात पोलिसांनी देखील महिलेला तात्काळ अटक केली… सध्या याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

असं देखील सांगण्यात येत आहे की, आरोपी महिला ख्याती विश्वकर्मा हिचं काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेला. लग्नाच्या पूर्वीपासून महिला पीडित मुलाच्या संपर्कात होती… 1 एप्रिल रोजी त्या महिलेने अल्पवयीन मुलाला हॉटेलमध्ये बोलावून त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. संबंधित घटना छत्तीसगड येथे घडली आहे.

सोशल मीडियाचा वापर आजचा पिढी मोठ्या प्रमाणात करत आहे. पण यामुळे घडणाऱ्या वाईट घटनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे अनोखळ्या व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका…. अशी सूचना देखील पोलीस वारंवार देत असतात.

Follow Us
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव नाही.
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक
खरात इथूनच करायचा काळे धंदे, मुंबईत 5 स्टार हॉटेलमधील रुम 365 दिवस बुक.
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा
बारामती पोटनिवडणुकीसाठी त्या बड्या नेत्याचा पाठिंबा.
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा
दादर स्थानकावर प्रचंड गर्दी... एल्फिस्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा.
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दिंडोरी प्रकरण: प्रशासनावर संताप, नगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती.
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप
शिंदे-खरात फोन कॉल्स प्रकरण तापलं; CDR लीकवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप.
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लढली नाही तर आम्ही लढणार, काँग्रेसचा इशारा.
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.