आई बाहेर ये लग्नाची पत्रिका द्यायची आहे… दरवाजा उघडताच धडाधड वृद्ध महिलेच्या डोक्यात घातल्या गोळ्या, धक्कादायक प्रकार
एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. वृद्ध महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलेल्या तिघांनी वृद्ध महिलेची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत... जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...

बुधवारी दुपारी जवळपास 3 वाजता वृद्ध महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ते देखील महिलेच्या 13 वर्षीय नाती समोर. आरोप व्यक्ती लग्नाची पत्रिका देण्याचं कारण करून महिलेच्या घरी गेला… त्यांनी महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला… तिचे आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकले आणि गोळ्या झाडून वृद्ध महिलेची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फरार असून, पोलीस त्यांच्या शोधात आहे. वृद्ध महिलेची हत्या सावत्र मुलांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण त्यांच्यामध्ये जमीनीवरून वाद सुरु होते. या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोरांनी महिलीची हत्या केली आहे. ते बुधवारी दुपारी लग्नाची पत्रिका देण्याच्या बहाण्याने आले होते. त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडला. त्यानंतर, त्यांनी एका वृद्ध महिलेच्या पायांना स्पर्श केला आणि तिच्या डोक्यात गोळी झाडली. महिला जखमी होताच, तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला रामसखी धाकड हिचे पती लक्ष्मी नारायण धाकड यांनी पहिल्या पत्नीच्या निधानंतर, 35 वर्षीय रामसखी हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. लक्ष्मी नारायण धाकड यांच्या पहिल्या पत्नीला तीन मुलं आणि दोन मुली होत्या… तर रामसखी तिच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला, मुनेशला, दुसऱ्या नवऱ्याच्या घरी सोबत घेऊन आली. पण त्यानंतर ती आई होऊ शकली नाही… मुनेश धाकड सध्या पत्नी आणि मुलांसोबत इंदूरमध्ये राहतो आणि गेल्या महिन्यात आईच्या उपचारासाठी गावात आला होता.
बुधवारी नक्की काय आणि कसं घडलं?
रामसखी नात राधिका हिच्यासोबत घरी होती. तेव्हा तीन व्यक्ती बाईकवर बसून घरी आले… घरी आल्यानंतर म्हणाले, ‘आई दरवाजा खोल लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो आहे…’, तेव्हा महिलेने दरवाजा उघडला आणि हत्यार लपवलेल्या तीन व्यक्तींनी वृद्ध महिलेच्या पायांना स्पर्श केला आणि तिच्या डोक्यात गोळी झाडली. नातीने सर्व घडना डोळ्यांनी पाहिल्यानंतर, ती देखील मोठ्याने किंचाळू लागली.
वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर आरोपींनी पळ काढला… राधिका हिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली आणि सासूला रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं… रामसखीचा भाऊ, महेश धाकड, यांना या हत्येमागे जमिनीचा वाद असल्याचा संशय आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे मेहुणे लक्ष्मी नारायण यांच्या मालकीची अंदाजे 35 एकर जमीन होती जी रामसखी आणि त्यांच्या पहिल्या पत्नीच्या पाच मुलांमध्ये विभागली गेली होती.
रामसखीला तिच्या वाट्याची जमीन तिचा मुलगा मुनेश धाकड याच्या नावावर हस्तांतरित करायची होती आणि ही प्रक्रिया सुरू होती. मात्र, लक्ष्मी नारायण यांचे मुलगे, शिवराज साहेब सिंग आणि राम कृष्ण, याला विरोध करत होते. असा आरोप आहे की, हे हस्तांतरण होण्यापूर्वीच एका कटात रामसखीची हत्या करण्यात आली. सध्या याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेश येथील शिवपुरी येथे घडली आहे.