वजन कमी करायचंय? फक्त ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा, करीना कपूरच्या फिटनेस कोचने सांगितलेल्या खास टीप्स
सेलिब्रिटी कायम त्यांच्या फिटनेसला अधिक वेळ देतात. बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही कोच असे देखील आहेत, जे कायम फिटनेस टीप्स देत असतात, अभिनेत्री करीना कपूर हिच्या कोचने देखील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे लक्षच देतच नाही. ऑफिसमधील ताण, घराची जबाबदारी, तणाव यांसारख्या गोष्टीमुळे अनेक समस्या डोकं वर काढतात… अशात तणावामुळे अनेकांचं वजन वाढतं.. म्हणून गेल्या काही दिवसांपासून अनेकांमध्ये फिटनेसचं क्रेझ देखील वाढताना दिसत आहे. शिवाय आजच्या धकाधकीच्या जीवनात वजन कमी करण्यासाठी लोकं अनेक उपाय करतात. अनेक जण जीमला जातात तर, काही आहारात बदल करतात. पण वजन कमी करणं आणि फीट असणं यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओच्या मदतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक सेलिब्रिटींचे फिटनेस कोच देखील फिटनेस टीप्स देत असतात.
अभिनेत्री करीना कपूर हिचे फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर हिने वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय सांगितले आहेत. रुजुता दिवेकर सांगे की, चुकीच्या मार्गाने झपाट्याने वजन कमी करण्यापेक्षा अधिक काळ वजन कमी करणे जास्त गरजेचं आहे, ज्याचा तुमच्या आरोग्यालाही फायदा होईल. प्रयत्न करन देखील वजन कमी होत नसेल तर, तुमच्या शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
द लँसेट डायबिटीज एन्ड एंडोक्राइनोलॉजी मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, बॉडी मास इंडेक्स (BMI) हे आरोग्य आणि फिटनेससाठी सर्वोत्तम मोजमाप नाही. रुजुता हिने सांगितल्यानुसार, अनेक जण वजन कमी करण्यासाठी स्पेशल हार्ड डायट पॅटर्न आणि व्यायाम करतात. पण तरी देखील वजन कमी होत नाही… अशात वजन वाढणं आणि फिटनेसमधील अंदर समजून घेणं फार गरजेचं आहे.
करीना कपूरच्या फिटनेस कोचने सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी…
रुजुताने सांगितलं की जर तुमच्या आकारात बदल झाला असेल. म्हणजे जर तुमच्या शरीराचा आकार कमी होत असेल आणि ते तुमच्या लक्षात येत असेल, तर समजून घ्या की तुमची चरबी कमी होत आहे. तुमच्या वजनात काही फरक दिसत नसला तरीही. शारीराच्या आकारात होणारा बदल देखील लक्षात ठेवावा. विशेषत: जर कंबरेच्या आकारात बदल होत असेल तर समजून घ्या की तुमचे वजन कमी होत आहे. यावरून तुम्ही समजू शकता की तुमच्या शरीराच्या अवयवांमधील चरबी कमी होत आहे. जे आरोग्यदायी लक्षण आहे.
तुमचं आरोग्य आणि फिटनेस तुमची काम करण्याची क्षमता ठरवतात. जर तुम्हाला अधिक पायऱ्या चढता येत असतील. जर तुम्ही मुलांसोबत शारीरिक खेळ खेळू शकत असाल किंवा अधिक चालणं आणि व्यायाम करू शकत असाल तर तुमची क्षमता सुधारत आहे. पण कोणतेही नवीन बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
