AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guess Who: अभिनेत्यांपासून लोकप्रिय क्रिकेटपर्यंत… अनेक पुरुषांना अभिनेत्रीने केलंय डेट, पण 46 वर्षी जगतेय एकटीच

Guess Who: राकेश बापट पासून युवराज सिंह याच्यापर्यंत... अनेक पुरुषांना 'या' अभिनेत्रीने केलंय डेट, पण वयाच्या 46 वर्षी जगतेय एकटीच आयुष्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

Guess Who: अभिनेत्यांपासून लोकप्रिय क्रिकेटपर्यंत... अनेक पुरुषांना अभिनेत्रीने केलंय डेट, पण 46 वर्षी जगतेय एकटीच
| Updated on: Apr 23, 2026 | 2:03 PM
Share

झगमगत्या विश्वात अशा असंख्य अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न केलं नाही. आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना देखील अभिनेत्री एकट्याच आयुष्य जगत आहेत. पण असं नाही की, या अभिनेत्रींच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झालीच नाही असं नाही. अभिनेत्री अनेक लोकप्रिय पुरुषांना डेट केलं, पण कोणासोबतच त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री शमिता शेट्टी आहे. शमिता हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं. पण बहीण शिल्पा शेट्टी हिच्याप्रमाणे चाहत्यांच्या मनावर तिला राज्य करता आलं नाही. पण शमिता तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली.

शमिता शेट्टी हिचं नाव अनेक सेलिब्रिटी पुरुषांसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आज वयाच्या 46 व्या वर्षी देखील शमिता एकटीच आयुष्य जगत आहे. आजही शमिका कायम कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. आता शमिता हिच्या बॉयफ्रेंडची संपूर्ण यादी समोर आली आहे. तर जाणून घ्या शमिता हिने किती पुरुषांना डेट केलं आहे.

अभिनेता राकेश बापट – ‘बिग बॉस’ मध्ये राकेश आणि शमिता यांच्या नावाच्या चर्चांना उधाण आलेलं. शो संपल्यानंतर अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण फार काळ त्यांचं नातं टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… सोशल मीडियावर त्यांनी ब्रेकअपची घोषणा देखील केली होती.

उदय चोप्रा – शमिता शेट्टीचं अभिनेता उदय चोप्रासोबतही अफेअर असल्याच्या अफवा आहेत. असं म्हटलं जातं की, ‘मोहब्बतें’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांचे अफेअर सुरू झाले. त्यानंतर ते काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही.

आफताब शिवदासानी – शमिता हिच्या बॉयफ्रेंडच्या यादीत अभिनेता आफताब शिवदासानी याचं नाव देखील सामिल आहे… रिपोर्टनुसार, एक काळ असा होता, जेव्हा आफताब आणि शमिता हित्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. तर दुसरीकडे, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

हरमन बावेजा – अभिनेता हरमन बावेजा याच्यासोबत देखील शमिता हिच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. पण त्यांचं नातं देखील फार काळ टिकलं नाही… दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचण्याआधीच संपलं…

युवराज सिंह – फक्त अभिनेतेच नाही तर, क्रिकेटरसोबत देखील शमिता हिच्या नावाच्या चर्चा रंगल्या. तिच्या बॉयफ्रेंडच्या यादीत युवराज सिंह देखील सामिल आहे… एक काळ असा होता जेव्हा दोघे एकमेकांना डेट करत होते. पण नातं फार काळ टिकलं नाही…

शमिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, वयाच्या 46 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटीच आयुष्य जगत आहे. बॉलिवूड पासून देखील अभिनेत्री दूर आहे. पण सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Follow Us
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...