AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात ही चूक कधीच करू नका, पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, ते आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हणतात की काही चुका अशा असतात त्यांना कधीही माफी मिळत नाही, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : आयुष्यात ही चूक कधीच करू नका, पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, चाणक्य काय म्हणतात?
chankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 2:06 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाला आपल्या आयुष्याचं योग्य व्यवस्थापन करता आलं पाहिजे, तरच तो आपल्या आयुष्यात यशस्वी होतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं व्यवस्थापन करता आलं नाही, तर तुमच्या वाट्याला नेहमीच दु:ख येतात. चाणक्य पुढे असेही म्हणतात की जेव्हा आपण या समाजात जन्म घेतो, तेव्हा आपण या समाजाचं काही तरी देणं लागत असतो, याचं भान आपल्याला असलं पाहिजे. त्यामुळे आपणं एखाद्या व्यक्तीला शक्य होईल तेवढी मदत केली पाहिजे. मात्र मदत करताना देखील तुम्हाला गरजू व्यक्ती ओळखता आला पाहिजे, जर तुम्हाला गरजू व्यक्ती ओळखता आला नाही आणि तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला मदत केली तर तुमची मोठी फसवणूक होते, आपण अशा व्यक्तीला मदत केली याचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो, त्यामुळे कोणालाही मदत करताना सावध असलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे आपल्या या ग्रंथामध्ये असंही म्हणतात की तुम्ही आयुष्यात कोणतीही चूक केली तरी तुम्हाला एखाद्यावेळेस माफी मिळू शकते, मात्र एखादा व्यक्ती एखाद्या संकटात सापडला असताना त्याच्यावर कधीही हसू नका, ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. कारण जर तुम्ही अशा व्यक्तीवर हसत असाल तर अशी व्यक्ती तुम्हाला त्याच्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. ती व्यक्ती कायमचा तुमचा शत्रू बनेल त्यामुळे कधीही कोणच्या दु:खावर हसू नका. लक्षात ठेवा वेळ सगळ्यावर येते, आज आनंदी असलेला उद्या दु:खी असतो,  उद्या दु:खी असलेला परवा आनंदी असतो, त्यामुळे कोणावरही हसू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

पुढे चाणक्य म्हणतात अजून एक महत्त्ववाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या आई-वडीलांना कधीही विसरू नका, जर तुम्ही तुमच्या आई-वडिलांना विसरलात तर ही तुमच्या आयुष्यातील एवढी मोठी चूक असेल की तुम्हाला पश्चताप करायला देखील वेळ मिळणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत