Crime News : लग्नात गरम न जेवण दिल्याने वाढपीवर झाडली गोळी, वऱ्हाड इकडं तिकडं पळू लागलं, काही लोकांनी तर…
तीन सख्खा भाावांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिस तिघांचा कसून शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर प्रदेश : राज्यातील अलीगढ (Aligad) जिल्ह्यात एका लग्नात वाढपीवरती गोळी झाडल्याने परिसरात वातावरण तंग आहे. ज्या तरुणाला गोळी मारली तो तरुण जखमी झाला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला, त्यावेळी तिथं गोळी मारणाऱ्या व्यक्तीला जमावाने अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांना दम देऊन गोळी मारणारा निघून गेला असल्याचे लोकांनी सांगितले. तीन सख्खा भाावांच्या (against three brother) विरोधात पोलिस स्टेशनमध्ये (police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिस तिघांचा कसून शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना गांधीपार्क परिसरातील मोहल्ला कुंवर नगर कॉलनीमधील आहे. लग्न मुलीच्या घरी होतं. मुलाकडचं सगळं वऱ्हाड तिथं आलं होतं. लग्न रितीरिवाजानुसार लागल्यानंतर सगळ्यांनी जेवायला घेतलं. जेवणाचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना तिथं तीन तरुण जेवायला बसले होते. तरुणांनी वाढप्याला जेवण गरम करण्यास सांगितले. पण वाढप्याने जेवण गरम करण्यास नकार दिला. त्यावेळी तिथं वाढप्याला तरुणांनी बेदम मारहाण केली आणि गोळी मारली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
