AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन दिवसात दीड कोटी रुपयांचे सोने जप्त, तस्करांना मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांची मदत ?

मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीसोबतच सोने तस्करीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनीटच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा भंडाफोट केला आहे.

दोन दिवसात दीड कोटी रुपयांचे सोने जप्त, तस्करांना मुंबई विमानतळ अधिकाऱ्यांची मदत ?
MUMBAI GOLD
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 11:20 PM
Share

मुंबई : मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीसोबतच सोने तस्करीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मुंबई विमानतळावर गेल्या दोन दिवसांत सुमारे दीड कोटी रुपयांचे सोने पकडण्यात आले आहे. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनीटच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा भंडाफोट केला आहे. 25 ऑक्टोबर रोजी 70 लाख आणि 24 ऑक्टोबर रोजी 25 लाखापेक्षा जास्त मूल्य असलेले सोने जप्त करण्यात आलेले आहे.

विमानाच्या सीटखाली लपवून दुबईहून आणले सोने

मिळालेल्या माहितीनुसार इतिहाद फ्लाइटने अबुधाबीहून मुंबईला एक विमान येत होते. या विमानात सीटखाली लपवून जवळपास 70 लाखांहून अधिक किमतीचे सोने मुंबईत तस्करीसाठी आणले जात होते. विमानाच्या सीटखाली लपवून हे सोने प्रवाशांनी मुंबईत आणले होते. मात्र संशय आल्यानंतर तपास करण्यात आला. यामध्ये सीटखाली तब्बल 70 लाख रुपयांचे सोने सापडले. कस्टम एअरपोर्ट इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे हे सोने जप्त केले असून प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

सोने तस्करीचा डाव हाणून पाडला

यासह, याच विमानातून आणखी एका प्रवाशाकडून 20 लाख रुपये मुल्य असलेले सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने प्रवाशाने त्याच्या जीन्स पॅन्टमध्ये लपवून आणले होते. तस्करांचा हा डावसुद्धा कस्टम एअरपोर्ट इन्टेलिजेन्सच्या अधिकऱ्यांनी हाणून पाडला.

इंडिगो फ्लाईटमध्येदेखील सोने तस्करी

त्याचप्रमाणे 24 ऑक्टोबर रोजीदेखील विमानतळ कस्टम एआययू युनिटने शारजाहून इंडिगो फ्लाईटमध्ये येणाऱ्या प्रवाशांकडून 25 लाखांचे सोने जप्त केले होते. हे सोने स्केटिंग किटच्या स्केटबोर्डच्या आत कॅव्हिटी बनवून लपवून आणण्यात आले होते. यावेळीदेखील विमानतळ कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करांना पकडले. दरम्यान सलग दोन दिवस मुंबई विमानतळावर तस्करीसाठी आणलेले सोने जप्त केले जात असल्यामुळे मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तस्करांना मदत मिळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दाताच्या खाचेत गोल्ड प्लेटस बसवून तस्करी

सप्टेंबर महिन्यात सोने तस्करीचा एक अजब प्रकार समोर आला होता. दिल्ली विमानतळावर  सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी उझबेकिस्तानच्या दोन नागरिकांना ताब्यात घेतले होते. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 951 ग्रॅम सोन्याचा साठा जप्त केला होता. बाजारपेठेत या सोन्याची किंमत तब्बल 45 लाख रुपये इतकी होती. या दोन उझबेकिस्तानी नागरिकांनी सोन्याच्या तस्करीसाठी जी पद्धत वापरली होती, ती खरोखर थक्क करणारी होती. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांची कसून तपासणी केली तेव्हा या दोघांनी तोंडात सोने लपवल्याचे समोर आले होते. या दोघांच्या तोंडात सोन्याचे कृत्रिम दात बसवले होते. तसेच काही दात काढून त्या खाचेत सोन्याच्या प्लेटस बसवण्यात आल्या होत्या. याशिवाय, त्यांच्या तोंडात सोन्याच्या चेनही कोंबल्या होत्या.

इतर बातम्या :

4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं

Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

Customs Airport Intelligence Unit seizes gold worth of 70 lakh in two days

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?