AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं

37 कोटी रुपयांचा इन्शुरन्स मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोरुग्णांचा खून करून स्वतःचा मृत्यू दखवण्यासाठी ही हत्या करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं
AHMEDNAGAR CRIME
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 8:35 PM
Share

अहमदनगर : 37 कोटी रुपयांचा इन्शुरन्स मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोरुग्णांचा खून करून स्वतःचा मृत्यू दखवण्यासाठी ही हत्या करण्यात आलीय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आलंय.

37 कोटी रुपये मिळावेत म्हणून खून

पैसे मिळवण्यासाठी कोण काय करेल आणि कुठल्या पातळीवर जाईल याचा नेम नाही. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील राजूरमधील धामणगाव पाट या गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे विमा मिळवण्यासाठी नवनाथ आनप या मनोरुग्णाची हत्या करण्यात आली आहे. विम्याचे 37 कोटी रुपये मिळावेत म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. मागील वीस वर्षापासून अमेरिकेत स्वयंपाकी म्हणून नोकरी करणाऱ्या प्रभाकर वाकचौरे याने हा हत्येचा कट रचला होता.

खून करण्यासाठी 4 महिने नियोजन 

मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकरने 2013 साली बायकोचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट इन्श्यूरन्स कंपनीकडे विमा काढला होता. या विम्याचा क्लेम मिळावा यासाठी प्रभाकर आपल्या गावी आला. आपल्या 4 साथीदाराच्या मदतीने 4 महिने नियोजन करून त्याने हत्येचा कट रचला.

विमा कंपनीला आला शंशय

प्रभाकरने एका मनोरुग्ण व्यक्तीचा खून करण्यासाठी सापाची मदत घेतली. त्याने विषारी सापाच्या दंशाने मनोरुग्णांचा खून करून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. हे पुरावे आणि कागदपत्रे वाकचौरे याने विमा कंपनीकडे सादर केले. मात्र याची पडताळणी करताना काहीतरी गडबड असल्याचा संशय विमा कंपनीला आला. त्यानंतर विमा कंपनीने राजूर पोलिसांची मदत घेतली.

आरोपींनी गुन्हा केला कबूल

राजूर पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. प्रभाकर वाघचौरे याचा मृत्यू झाला नसून तो जिवंत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या 4 साथीदारांनी नवनाथ अनप या मनोरुग्णाची विषारी सापाच्या दंशाने हत्या केल्याची कबुली दिली आहे. प्रभाकर वाकचौरे याने विम्याचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी एका मनोरुग्ण व्यक्तीची हत्या केली. तसेच स्वत:चा मृत्यू झाल्याचा बनाव केला. या घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

इतर बातम्या :

Bangladesh Voilence: फेसबुक फॉलोवर्स वाढवण्यासाठी बांगलादेश हिंसा भडकली?, नेमकं काय घडलं?

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

दीडशहाण्या बाबाचे 14 महिन्यांच्या बाळावर घरीच चुकीचे उपचार; मुलीचा मृत्यू अन् कसाई बापाला बेड्या!

(man murdered mentally retarded person for insurance benefits in ahmed nagar police arrested accused)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.