पुण्यात महिलेला 65 हजारांचा गंडा, ऑनलाईन केक बूक करताना फसवणूक, OTP सांगणं महागात

30 वर्षीय तक्रारदार महिला ही पुण्यातील वाकड येथील रहिवासी असून तिने 14 फेब्रुवारी रोजी दुपारी ऑनलाईन केक बुक केला होता. काही वेळाने तिला देवेंद्र कुमार नामक व्यक्तीचा फोन आला.

पुण्यात महिलेला 65 हजारांचा गंडा, ऑनलाईन केक बूक करताना फसवणूक, OTP सांगणं महागात
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 17, 2022 | 1:42 PM

पुणे : ऑनलाईन केक बुक करताना महिलेची फसवणूक (Cyber Fraud) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर चोरांनी महिलेला 65 हजार 191 रुपयांचा गंडा घातला. महिलेला एका लिंकद्वारे तिचे बँक डिटेल्स शेअर करण्यास सांगितले गेले. तिने ओटीपी देताच पाच वेळा व्यवहार करुन तिच्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे काढून घेण्यात आले. पुण्यात (Pune Crime) 30 वर्षीय महिलेने वाकड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर क्लिक करु नका, आपले बँक तपशील शेअर करुन, ओटीपी (OTP) कुठल्याही व्यक्तीला सांगू नका, यासारखे ऑनलाईन व्यवहारांचे मूलभूत नियम पाळण्याविषयी वारंवार आवाहन करुनही अनेक जण फसवणुकीला बळी पडताना दिसत आहेत.

काय आहे प्रकरण?

30 वर्षीय तक्रारदार महिला ही पुण्यातील वाकड येथील रहिवासी असून तिने 14 फेब्रुवारी रोजी दुपारी ऑनलाईन केक बुक केला होता. काही वेळाने तिला देवेंद्र कुमार नामक व्यक्तीचा फोन आला.

नेमकं काय घडलं?

कुमारने महिलेला बँक खात्याचे तपशील देण्यास सांगितले आणि एक ऑनलाईन लिंक शेअर केली. त्यानंतर महिलेला वन टाईम पासवर्ड (OTP) मिळाला, जो तिने देवेंद्र कुमारसोबत शेअर केला. त्यानंतर लगेचच तिच्या खात्यातून पाच ऑनलाईन व्यवहारांद्वारे एकूण 65,191 रुपये डेबिट करण्यात आले.

परस्पर बँक खातं उघडलं

एफआयआरमधील माहितीनुसार, महिलेने भामट्याला याचा जाब विचारला असता त्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याऐवजी तिचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरुन तिच्या नावावर बँक खाते उघडल्याचा प्रकार समोर आला आहे.

पैसे परत न मिळाल्याने महिलेने पोलिसात जाऊन फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक कडबाने तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

सोनम कपूरच्या सासऱ्यांना लागला 27 कोटी रुपयांचा चुना; जाणून घ्या, कशी झाली ही फसवणूक?

तुम्हाला देखील 25 लाखांचा ‘हा’ मेसेज आलाय? नेमकं सत्य काय जाणून घ्या

तुमच्या ही बँक खात्यातून पैसे झाले गायब? चिंता करू नका अशाप्रकारे थांबवा पुढील धोका

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.