…आता फेसबूक कर्ज देणार, पण सावध राहा, फेक साईटवर सायबर गँगच्या जाळ्यात अडकू नका

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 28, 2021 | 8:46 AM

फेसबुक सोशल नेटवर्किंगचं सर्वात प्रभावी माध्यम, देशातील मोठा नेटकरी वर्ग फेसबुकच्या माध्यमातून सोशली कनेक्ट झालाय. पण आता फेसबुक भारतात लहान आणि मध्यम उद्योगांना 50 लाखांपर्यंत कर्जंही देणार आहेत. कर्ज देण्यासाठी फेसबुकने 'इंडिफाय' कंपनीसोबत करार केलाय, ही कंपनी भारतात लघू आणि मध्यम उद्योगांना कर्जवाटप करते. फेसबुकने देशभरातील 200 शहरात कर्ज देण्यासाठी सोय उपलब्ध केली आहे.

...आता फेसबूक कर्ज देणार, पण सावध राहा, फेक साईटवर सायबर गँगच्या जाळ्यात अडकू नका
Facebook

नागपूर : फेसबुक सोशल नेटवर्किंगचं सर्वात प्रभावी माध्यम, देशातील मोठा नेटकरी वर्ग फेसबुकच्या माध्यमातून सोशली कनेक्ट झालाय. पण आता फेसबुक भारतात लहान आणि मध्यम उद्योगांना 50 लाखांपर्यंत कर्जंही देणार आहेत. कर्ज देण्यासाठी फेसबुकने ‘इंडिफाय’ कंपनीसोबत करार केलाय, ही कंपनी भारतात लघू आणि मध्यम उद्योगांना कर्जवाटप करते. फेसबुकने देशभरातील 200 शहरात कर्ज देण्यासाठी सोय उपलब्ध केली आहे. पण, फेसबुककडून कर्ज घेण्यासाठी फक्त ऑनलाईन अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. यातूनच सायबर गुन्हेगारांना आयतं सावज मिळून फसवणूक होण्याचा धोकाही सायबर तज्ज्ञांकडून वर्तवला जातो आहे.

‘फेसबुकने लहान आणि मध्यम उद्योजकांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कोरोनात आर्थिक संकटात असलेल्या छोट्या – मोठ्या उद्योगांना उभारी देण्यासाठी याचा फायदा होऊ शततो. पण, लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेल्या व्यापाऱ्यांना, त्यांच्या गरजेचा फायदा घेऊन सोशल मिडियावरील सायबर गुन्हेगार नवा सावज हेरण्याची भिती आहे. फेसबुकसारख्याच फेक वेबसाईट तयार करुन फसवे, फेक मेसेज पाठवून सायबर गुन्हेगार गरजू व्यापाऱ्यांना टार्गेट करुन आपल्या जाळ्यात ओढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशाच प्रकारे अनेतांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांनी यापूर्वीही डल्ला मारलाय, त्यामुळे फेसबुककडे कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करताना, सावध राहा’ असं आवाहन सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी केलं आहे.

फेसबुकने ‘इंडिफाय’ या कंपनीसोबत करार केला असून लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देऊन त्यांना नवी उभारी देण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकले. विशेष म्हणजे फेसबुकची ही कर्ज सेवा ऑनलाईन अर्ज करुनच मिळणार आहे. त्यामुळे आता फेसबुकसारखेच संकेतस्थळ, अनधिकृत मोबाईल अप्लिकेशन तयार होण्याची शक्यता आहे. फेसबुक प्रत्येकाच्याच ओळखीचे आणि विश्वासाचे असल्याने त्याचा गैरवापर करीत बॅंकेचे ओटीपीही हस्तगत करुन सायबर गुन्हेगार कुणाचीही फसवणूक करु शकतात, अशी भीतीही अजित पारसे यांंनी व्यक्त केली आहे. विविध अनधिकृत मोबाईल अप्लिकेशन्सचा वापर करुन फसवे कॉल करुन व्यापाऱ्यांची लूट करण्याचीही शक्यता आहे. सायबर गुन्हेगार बनावटी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाईट्स बनवून संबंधित व्यापारी, उद्योजकांची कागदपत्रे, बँक खात्यासह हस्तगत करु शकतात. कोरोनामुळे प्रत्येकच उद्योग मंदावला असून उद्योजकांंना आर्थिक मदतीची गरज आहे. नेमकी हीच बाब हेरुन सायबर गुन्हेगार अशा लोकांना लक्ष्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

फेसबुकपेक्षा कमी व्याज दरावर कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष फेसबुकसारख्याच संकेतस्थळ, ॲप्लिकेशन्स तयार करुन सायबर गुन्हेगार पाठवू शकतात. परिणामी मोठ्या फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.

फेसबुकने महिला उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय, महिला उद्योजकांच्या औद्योगिक विकासासाठी हा चांगला निर्णय आहे. पण, यामुळे सायबर गुन्हेगारांकडून महिला उद्योजकांच्या फसवणूकीचीही जास्त भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ‘फेसबुक कर्जाच्या नावावर आर्थिक व्यवहार करताना संबंधित व्यक्ती अधिकृत प्रतिनिधी आहे की नाही, याची खात्री करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांनी सोशल मीडियाचा वापर आर्थिकदृष्ट्या गरज असलेल्यांची रेकी करण्यासाठी सुरु केला आहे. त्यामुळे उद्योजक किंवा व्यापाऱ्यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अनोळखी यूजर्ससोबत पोस्ट करु नका. बेसावध, बेजाबदार पोस्टमुळे नागरिक सायबर गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट ठरु शकते. त्यामुळे फेसबुककडून कर्ज घेताना प्रत्येक पाऊल सावधपणे टाकण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा

नागपुरातील तरुणाचा चोरीचा अनोखा फंडा, ऑनलाईन ऑर्डर, डिलिव्हरी बॉय आल्यावर पाच मिनिटात अफरातफर, नंतर वस्तू परत

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI