AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायबर हल्ला की खरंच सर्व्हर डाऊन? व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊनवर सायबर तज्ज्ञ म्हणतात….

जगभरातील नेटीझन्सच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलेल्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर सारख्या सोशल मीडिया साईट्स अचानक बंद पडल्या आहेत. या साईट्स डाऊन झाल्याने युजर्सला अनेक अडचणी येत आहेत.

सायबर हल्ला की खरंच सर्व्हर डाऊन? व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊनवर सायबर तज्ज्ञ म्हणतात....
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 11:06 PM
Share

मुंबई : जगभरातील नेटीझन्सच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलेल्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर सारख्या सोशल मीडिया साईट्स अचानक बंद पडल्या आहेत. या साईट्स डाऊन झाल्याने युजर्सला अनेक अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे या सोशल मीडिया साईट्सवर अनेकांचे व्यवसाय देखील अवलंबून आहेत. तसेच याच माध्यमांनी अनेकांना प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, याच माध्यमाच्या सेवेत आज अचानक ब्लॅकआऊट झाला. सर्व साईट्सचे सर्व्हर डाऊन झाले. सोशल मीडिया साईट्स डाऊन होण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. पण तब्बल दीड ते दोन तास या सोशल मीडिया साईट्स डाऊन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अनेकांनी हा एक सायबर हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पण या मागचं नेमकं खरं आणि अधिकृत कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही.

सोशल साईट्स डाऊन होण्यामागे अनेक कारणे, तज्ज्ञांचा दावा

याच समस्येमागे नेमकं कारण काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यामागे अनेक कंगोरे असल्याचं सांगितलं. ही समस्या उद्भवण्यामागे नेमके काय कारणं असू शकतात याबाबत त्यांनी माहिती दिली. तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सायबर तज्ज्ञ नेमकं काय म्हणाले?

इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेंजर सारख्या सोशल मीडिया साईट्स वापरणाऱ्या जवळपास सर्वच युजर्सना आज अडचणी येत आहेत. या सर्व सोशल मीडिया साईट्स डाऊन झाल्याने वापरकर्त्यांसाठी हा ब्लॅकआऊटच आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने ही समस्या उद्भवली आहे. सर्व्हर डाऊन होण्याचं प्रमाण हल्ली प्रचंड वाढलं आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात. काही टेक्निकल अडचणी असतील, तसेच डिडगची सुद्धा समस्या असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे हा एक सायबर हल्ला देखील असू शकतो. जसा-जसा वेळ जाईल किंवा उद्यापर्यंत हा सायबर हल्ला आहे की सर्व्हर डाऊन आहे, याची माहिती समोर येईल, अशी प्रतिक्रिया सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी केली.

अडचणी कधी दूर होतील?

व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊन झाल्याने नेटीझन्सना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी कधी दूर होतील किंवा या सोशल मीडिया साईट्स पूर्ववत कधी होतील याबाबतची माहिती आता व्हॉट्सअॅप आणि फेसबुककडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ट्विटरवर नेमकं काय म्हणाले?

“काही लोकांना व्हाट्सअॅप वापरताना अडचणी येत आहेत, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच व्हाट्सअॅप पुन्हा आधीसारखं नॉर्मल सुरु होईल. त्याबाबतची माहिती लवकरच आम्ही तुला कळवू. आपल्या संयमाबद्दल धन्यवाद”, असं फेसबुक आणि व्हाट्सअॅप टीमने ट्विटरवर सांगितलं आहे.

नेमक्या अडचणी काय?

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे.  व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.

व्हाट्सअॅपला नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीयेत. त्याचबरोबर व्हाट्सअॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचण येत आहे. तर दुसरीकडे फेसबुक तसेच फेसुकच्या मालकीचे असलेले मेसेजिंग अॅप मेसेंजरसुद्धा डाऊन झाले आहे. कोणतेही संदेश जात किंवा येत नाहीयेत. संदेश वहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे ही अडचण नेमकी का येतेय, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. इन्स्टाग्रामचीही तीच स्थिती आहे.
हेही वाचा :

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.