फेसबुक, व्हॉट्सअॅप पुन्हा कधी सुरु होणार? अधिकृत माहिती जारी

जगभरात सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊन असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊन झाल्याने नेटीझन्सना अनेक अडचणी येत आहेत.

फेसबुक, व्हॉट्सअॅप पुन्हा कधी सुरु होणार? अधिकृत माहिती जारी
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : जगभरात सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊन असल्याची माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक डाऊन झाल्याने नेटीझन्सना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणी कधी दूर होतील किंवा या सोशल मीडिया साईट्स पूर्ववत कधी होतील याबाबतची माहिती आता व्हॉट्सअॅप आणि फेसबुककडून अधिकृतपणे देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

व्हॉट्सअॅप आणि फेसबुक ट्विटरवर नेमकं काय म्हणाले?

“काही लोकांना व्हाट्सअॅप वापरताना अडचणी येत आहेत, अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. लवकरच व्हाट्सअॅप पुन्हा आधीसारखं नॉर्मल सुरु होईल. त्याबाबतची माहिती लवकरच आम्ही तुला कळवू. आपल्या संयमाबद्दल धन्यवाद”, असं फेसबुक आणि व्हाट्सअॅप टीमने ट्विटरवर सांगितलं आहे.

सर्व्हर अचानकपणे बंद, कारण अद्याप अस्पष्ट

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली आहेत. हा प्रकार साधारणपणे मागील वीस मिनिटांपासून जाणवत आहे.  व्हॉट्सअॅप अचानकपणे बंद पडल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड सुरु झाला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.

फेसबुक, मेसेंजरही बंद, नेमक्या अडचणी काय?

व्हाट्सअॅपला नवे मेसेज सेंड आणि रिसिव्ह होत नाहीयेत. त्याचबरोबर व्हाट्सअॅप स्टेटसही अपलोड होण्यास अडचण येत आहे. तर दुसरीकडे फेसबुक तसेच फेसुकच्या मालकीचे असलेले मेसेजिंग अॅप मेसेंजरसुद्धा डाऊन झाले आहे. कोणतेही संदेश जात किंवा येत नाहीयेत. संदेश वहनास अडचणी येत असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे ही अडचण नेमकी का येतेय, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीये. इन्स्टाग्रामचीही तीच स्थिती आहे.
हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI