AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खाडीला भरती आली आणि… धड आणि शरीर वेगळं असलेल्या डेडबॉडीबद्दलची धक्कादायक माहिती समोर; ठाण्यात काय घडलं?

भिवंडीच्या ईदगाह झोपडपट्टीजवळील दलदलीत सापडलेल्या महिला शरीराच्या डोक्याच्या घटनेचा उलगडा भोईवाडा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी 24 तासांत मृत महिलेची ओळख पटवून 48 तासांत तिच्या पतीला अटक केली.

खाडीला भरती आली आणि... धड आणि शरीर वेगळं असलेल्या डेडबॉडीबद्दलची धक्कादायक माहिती समोर; ठाण्यात काय घडलं?
क्राईम न्यूज
| Updated on: Sep 04, 2025 | 2:40 PM
Share

भिवंडी शहरातील खाडी लगतच्या ईदगाह झोपडपट्टी जवळील दलदलीत 30 ऑगस्ट रोजी धडा वेगळ्या आढळलेल्या महिला शिर आढळून आल्या नंतर या महिलेची हत्या केलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात स्थानिक भोईवाडा पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात हत्या झालेल्या महिलेची ओळख पटवून 48 तासात हत्या करणाऱ्या पतीस अटक करण्यात यश मिळवले आहे.परवीन उर्फ मुस्कान वय 26 असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून या गुन्ह्यात पती तहा इम्तियाज अन्सारी या अटक केली आहे.

काय घडलं ?

ईदगाह झोपडपट्टी जवळील खाडी लगतच्या दलदलीत 30 ऑगस्ट रोजी धडा वेगळे महिलेचे शिर आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मृत महिलेची ओळख पटवणे व त्यानंतर हत्येचा आरोपी पकडणे असे मोठे आव्हान भोईवाडा पोलिसांसमोर होते. भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांसह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद कुंभार व त्यांच्या पोलिस पथकातील पोलिसांनी ईदगाह झोपडपट्टीत माहिती घेण्यास सुरवात केली.

त्यामध्ये येथील एक महिला दिसत नसल्या बद्दल माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करीत चौकशीस सुरवात केली. तेव्हा परवीन उर्फ मुस्कान या महिलेचा तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर माहिती घेतली असता तिचा चालक पती घरी नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी शोध घेत त्याला 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर पती तहा याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी नेऊन हत्या केलेल्या पत्नीचे धड कोठे आहे त्याबाबत शोध घेण्यासाठी खाडी पात्रात बोटीच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला.

का केली हत्या ?

दोन्ही पतिपत्नीमध्ये वैयक्तिक संशयावरून वाद होत असत, कधीकधी हाणामारी सुद्धा होत असे. तर मृत महिला परवीन ही 28 ऑगस्ट रोजी सुद्धा घरातून निघून गेली होती त्यामुळे वाद झाला होता. त्याच रागातून पती तहा इम्तियाज अन्सारी याने 29 ऑगस्ट रोजी पत्नी परवीन हिची क्रूरपणे हत्या केली. त्यावेळी त्याने पत्नीचे शिर धडापासून वेगळे करीत शरीराचे दोन तुकडे करीत ते खाडीत भरतीचे पाणी वाढले असताना त्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी घटनास्थळी स्थानिक पोलिसांसह फॉरेन्सिक पथक व श्वान पथकास पाचारण करून शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण अजूनही धड न सापडल्याने खाडी लगतच्या पोलिस ठाणे यांना पत्राद्वारे या बाबत कळवण्यात आलं . दरम्यान आरोपी पती तहा इम्तियाज अन्सारी या भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्याला 11 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.