AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Crime | मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 60 वर्षीय अधिकाऱ्याला अटक

मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदावर काम करणाऱ्या कैलाश कुमार लाल दासला अटक करण्यात आली आहे

Delhi Crime | मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 60 वर्षीय अधिकाऱ्याला अटक
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 08, 2022 | 1:32 PM
Share

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दोन महिन्यांच्या शोधानंतर मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) केल्याच्या आरोपाखाली एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO- ग्रेड II) कैलाश कुमार लाल दास आरोपी असून तो सब-इन्स्पेक्टरच्या (Sub Inspector) दर्जाचा अधिकारी आहे. आरके पुरम येथील रहिवासी असलेल्या दासने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले की, तो पीडितेच्या वडिलांचा गेल्या सहा-सात वर्षांपासून मित्र आहे. त्यामुळे तो वारंवार त्यांच्या घरी जात येत असे.

काय आहे प्रकरण?

मित्राच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका 60 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदावर काम करणाऱ्या कैलाश कुमार लाल दासने आपल्या मित्राला वचन दिले होते की त्याच्या मुलीला योग्य नोकरी मिळवून देण्यास मदत करेल.

हॉटेलमध्ये धमकावून बलात्कार

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिला सात मार्च रोजी मोतीबाग मेट्रो स्टेशनजवळ दासपाशी सोडले. त्यानंतर, आरोपीने अल्पवयीन मुलीला मध्य दिल्लीतील करोल बाग येथील हॉटेलमध्ये नेले, जिथे त्याने तिला कथितरित्या धमकावून तिच्यावर बलात्कार केला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

पीडितेने तिच्या आई-वडिलांना फोन करुन आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर करोलबाग पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि दोन महिन्यांच्या शोधानंतर आरोपी दासला अटक करण्यात आली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.