मोबाईल घरी ठेवून दरोडा, कोड नंबरने एकमेकांना हाका, दुहेरी हत्या करणारे पाच दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात कसे सापडले?

घटनेच्या वेळी, ते एकमेकांना त्यांच्या नावाने नाही तर कोड 1,2,3,4 आणि 5 ने बोलवत होते. घटनेच्या वेळी कोणीही फोन आणला नव्हता. याआधीही ते VoIP च्या माध्यमातून बोलत होते.

मोबाईल घरी ठेवून दरोडा, कोड नंबरने एकमेकांना हाका, दुहेरी हत्या करणारे पाच दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात कसे सापडले?
दिल्लीत दरोडा, पाच जण अटकेत
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 12:01 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगपुरा एक्स्टेंशनमध्ये 14-15 नोव्हेंबरच्या मध्यरात्री झालेल्या सुजला आणि मीना या दोन मोलकरणींच्या खून प्रकरणाचा छडा लागला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले पाच आरोपी पकडले गेले आहेत. घरावर दरोडा घालून आरोपींनी हे दुहेरी हत्याकांड घडवले होते. दोघींनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केल्यामुळे दरोडेखोरांनी त्यांची हत्या केल्याचा संशय होता. आरोपींकडून घरातून लुटलेले 90 लाख रुपयांचे देशी-परदेशी चलनही जप्त करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या बाईकच्या नोंदणी क्रमांकावरून हत्येचे गूढ उकलले आहे. हा क्रमांक उत्तर प्रदेशात रजिस्टर असून त्यामुळे पोलिस दुचाकीच्या मालकापर्यंत पोहोचू शकले. बाईक मालक सचित सक्सेना बरेलीचा रहिवासी आहे. पोलिसांच्या चौकशीत या दुहेरी हत्याकांड आणि दरोड्याचा मुख्य सूत्रधार एकच असल्याचे समोर आले. सुमारे दोन वर्षांपूर्वी येथे काम करणाऱ्या एका मोलकरणीचा तो भाचा आहे, असे चौकशीत समोर आले.

जंगपुरा एक्स्टेंशनमधील या घरात मोठी रक्कम असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्याने त्याच्या अन्य चार साथीदारांसह दरोड्याची योजना आखली. अन्य चौघांनाही एसीपी मनोज सिन्हा, स्पेशल स्टाफचे एसआय मनोज, मंजूर आलम आणि एएसआय श्यामवीर यांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बारावी पास तरुणाकडून घराची रेकी

पोलिसांनी सांगितले की, बरेलीच्या सचित सक्सेना व्यतिरिक्त, भोगलचा रहिवासी प्रशांत, चिराग दिल्लीचा अनिकेत झा, कोटला मुबारकपूरचा रमेश आणि चिराग दिल्लीचा धनंजय गुलिया यांचा समावेश आहे. सचितने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानेच घराची रेकी करून दरोडा टाकला. 22 वर्षीय प्रशांत हा विमा क्षेत्रातील एका खासगी कंपनीत काम करतो. इतर तिघांनीही बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. यापैकी कोणाचाही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.

दरोड्याच्या वेळी काय केलं

पोलिसांनी त्यांच्याकडून क्लोरोफॉर्म, दोरी, कटर, पंच, घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि सात मोबाईल फोन जप्त केले आहेत. घटनेच्या वेळी, ते एकमेकांना त्यांच्या नावाने नाही तर कोड 1,2,3,4 आणि 5 ने बोलवत होते. घटनेच्या वेळी कोणीही फोन आणला नव्हता. याआधीही ते VoIP च्या माध्यमातून बोलत होते.

दोघींची हत्या करुन दरोडा

14 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराजवळील उद्यानात हे सर्वजण दरोडा टाकण्यासाठी जमले होते. तिथे सुमारे साडेतीन तास वाट पाहिल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास ते मागील गेटमधून घरात शिरले. त्यांनी आधी मोलकरीण मीनाचे हात-पाय बांधून तिला क्लोरोफॉर्म हुंगायला दिले आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर दुसरी मोलकरीण सुजला हिला बेशुद्ध करुन उशीने तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर घरावर दरोडा टाकून ते पसार झाले होते.

संबंधित बातम्या :

दोघा पोलिसांची थेट न्यायाधीशांना मारहाण, पिस्तुलही ताणले, भर कोर्टात हलकल्लोळ

विवाहबाह्य संबंधातून अल्पवयीन मुलाकडून विवाहितेची हत्या, मृतदेहाचे प्रायव्हेट पार्टही पेटवले

महिला लिपिकाची राहत्या घरी आत्महत्या, पती म्हणतो, ‘त्याच्या’ त्रासामुळे बायकोने आयुष्य संपवलं

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.