AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायको अशोकची, आवडायची अखिलेशला; माझ्या पत्नीपासून लांब रहा.. गुपचूप बेडरुममध्ये शिरला अन्…

एक धक्क्दायक प्रकरण समोर आले आहे. अखिलेश आणि अशोक हे चांगले मित्र होते. मात्र, अचानक अखिलेशला अशोकची पत्नी आवडू लागली. त्यानंतर जे घडलं....

बायको अशोकची, आवडायची अखिलेशला; माझ्या पत्नीपासून लांब रहा.. गुपचूप बेडरुममध्ये शिरला अन्...
CrimeImage Credit source: AI Image
| Updated on: May 26, 2025 | 5:49 PM
Share

दिल्लीच्या कटवारिया सराई येथे एक भयानक घटना घडली आहे. येथे अशोक कुमार यांची पत्नीशी त्यांचाच सहकारी अखिलेश कुमार वारंवार भेटत होता. जेव्हा पतीला याची कल्पना आली, तेव्हा त्याने अखिलेशला आपल्या पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, या गोष्टीमुळे अखिलेशचा राग अनावर झाला आणि त्याने अशी कृती केली, जी तुम्हालाही हादरवून सोडेल. आता या संपूर्ण प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेऊया.

हल्ल्याची कहाणी

जेव्हा अशोकने अखिलेशला आपल्या पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले, तेव्हा अखिलेशने दाम्पत्यावर हातोड्याने हल्ला केला. या हल्ल्यात अशोकचा जागिच मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी अखिलेश आणि मृत अशोक कुमार पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. अखिलेशने पोलिसांना सांगितले की, तो अशोकच्या पत्नीला पसंद करत होता आणि अनेकदा तिच्याशी भेटण्यासाठी घरी येत होता. पण जेव्हा अशोकला याची माहिती मिळाली, तेव्हा त्याने अखिलेशला आपल्या पत्नीपासून दूर राहण्यास सांगितले. यामुळे अखिलेश राग अनावर झाला आणि त्याने दाम्पत्यावर हातोड्याने हल्ला केला. वाचा: सुंदर काकीच्या प्रेमात दोन पुतणे, नवऱ्याने नको त्या अवस्थेत पकडलं अन्… कळल्यावर पोलिसांचाही घाम फुटला

पोलिसांचा तपास सुरु

पोलिसांनी सांगितले की, 21 मे रोजी रात्री किशनगढ़ पोलीस ठाण्याला कटवारिया सराई येथील घराच्या पहिल्या मजल्यावर एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच मृत अशोक आणि त्याची पत्नी यांच्या मोबाईल फोनांची तपासणी केली.

अखिलेशला अटक

पोलिसांनी अखिलेशचा 700 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि त्याला रायबरेली येथून अटक केली. पोलिसांनी अखिलेशला दिल्लीत आणून त्याची चौकशी सुरू केली. चौकशीत अखिलेशने सांगितले की, रागाच्या भरात त्याने दाम्पत्यावर हल्ला केला. पोलिसांनी आरोपीकडून हल्ल्यात वापरलेला हातोडाही जप्त केला आहे. न्यायालयाने अखिलेशला तुरुंगात पाठवले असून, पुढील तपास आणि आरोपीविरुद्ध कारवाई सुरू आहे. जखमी महिलेचे एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!