बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला

| Updated on: Jun 14, 2021 | 4:02 PM

तक्रारदार तरुणाची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. फेसबुक फ्रेण्डने त्याच्या घरी येण्यात रस दाखवला. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवलं.

बायको नसताना फेसबुक फ्रेण्डला घरी बोलावलं, तासाभरात जे घडलं, त्याने तरुणच हादरला
फेसबुक फ्रेण्डचा तरुणाला गंडा
Follow us on

नवी दिल्ली : फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणीला घरी बोलावणं दिल्लीतील तरुणाला चांगलंच महागात पडलं. बायकोच्या अनुपस्थितीत घरी आलेली फेसबुक फ्रेण्ड सोनं लुटून पसार झाली. सामान आणण्याच्या बहाण्याने तिने तरुणाला घराबाहेर पाठवलं आणि संधीचा फायदा घेत तिने त्याच्या पत्नीचे दागिने आणि 22 हजार रुपयांसह पोबारा केला. (Delhi Man’s Facebook Friend duped him)

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी

दिल्लीत राहणाऱ्या पीडित तरुणाची आरोपी तरुणीशी फेसबुकवर ओळख झाली. मैत्री झाल्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यामुळे तरुणाने तिला घरी बोलावलं. तरुणीने चलाखीने त्याला बाजारात सामान आणण्यासाठी पाठवलं. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत ती दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली. तरुणाने तिला फोन केला, तेव्हा त्यालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तिने दिली. कल्याणपुरी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

हेमलता पाठकशी फेसबुकवर ओळख

तक्रारदार तरुण त्रिलोकपुरी भागात पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. लखनौमध्ये राहणाऱ्या हेमलता पाठक नावाच्या तरुणीशी त्याची फेसबुकवर ओळख झाली. तिने आपण ज्योतिषी असल्याचं तरुणाला सांगितलं होतं. सुरुवातीला चॅटिंग झाल्यानंतर दोघांनी नंबर शेअर केले. दोघांमध्ये गप्पा वाढल्या. तो तिला हरिद्वार आणि वृंदावनलाही फिरण्यासाठी घेऊन गेला होता. अनेक वेळा ते दिल्लीत भेटले होते.

दागिने आणि 22 हजार रुपयांसह पोबारा

तक्रारदार तरुणाची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. हेमलताने त्याच्या घरी येण्यात रस दाखवला. त्यानुसार शुक्रवारी ती त्याच्या घरी गेली. त्यानंतर सामान आणण्याच्या बहाण्याने तिने त्याला घराबाहेर पाठवलं. तरुण घरी आला असता, त्याला धक्काच बसला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं. घरातील लॉकर उघडा होता. पत्नीचे दागिने आणि 22 हजार रुपये गायब झाले होते. पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तरुणीचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या 

माजी नगरसेवकासह दुसऱ्या पत्नीने मार्केटमध्ये कपडे फाडले, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार

चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर आणले, फेसबुक मित्रांच्या मदतीने बलात्कार

(Delhi Man’s Facebook Friend duped him)