माजी नगरसेवकासह दुसऱ्या पत्नीने मार्केटमध्ये कपडे फाडले, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार

अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

माजी नगरसेवकासह दुसऱ्या पत्नीने मार्केटमध्ये कपडे फाडले, पहिल्या पत्नीची पोलिसात तक्रार
माजी नगरसेवक अशोक कांबळे

सांगली : रिपब्लिकन पार्टी युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्यावर मिरजेत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळेंसह त्यांच्या दुसऱ्या पत्नीने मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. अशोक कांबळे यांच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli ex corporator Ashok Kamble first wife complaints of molestation)

भर मार्केटमध्ये नगरसेवकाने मारहाण केल्याचा दावा

अशोक कांबळे यांची पहिली पत्नी ही भाजी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये गेली होती. त्यावेळी अशोक कांबळे हे एका महिलेसोबत तिला आढळून आले. चार महिने घरी आला नाहीत, घरी चला असे पहिल्या पत्नीने अशोक कांबळे यांना दटावले. यावेळी अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीला मारहाण करुन शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

कांबळेंसह दुसऱ्या पत्नीवरही पहिल्या बायकोचा आरोप

धक्कादायक म्हणजे आपले कपडे फाडल्याची तक्रारही पहिल्या पत्नीने अशोक कांबळे आणि दुसऱ्या पत्नीविरोधात केली आहे. याबाबत मिरज शहर पोलिसात अशोक कांबळे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीवर मारहाण शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन

दुसरीकडे, वसई विरार महापालिकेच्या तुलिंज हॉस्पिटलमधील एका महिला आणि पुरुष डॉक्टरसोबत असभ्य वर्तन करण्यात आले. दारुच्या नशेत आलेल्या रुग्ण आणि त्याच्या मित्रांकडून दोघांना धक्काबुक्की करण्यात आली. त्याचप्रमाणे अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केल्याचा आरोप आहे. तुलिंज हॉस्पिटलमधील केबिनच्या काचाही टोळक्याने फोडल्या. ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

एकाला अटक, तिघे पसार

डॉक्टरांसोबत झालेला हा धक्कादायक प्रकार हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात चौघा जणांविरोधात संगनमताने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीन जण पसार झाले आहेत.

संबंधित बातम्या :

नवविवाहित मुलीची आई-वडिलांकडून हत्या, कोरोनाने बळी गेल्याचा बनाव

मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड

(Sangli ex corporator Ashok Kamble first wife complaints of molestation)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI