AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर्ववैमनस्यातून पेटलं भांडण, तरूणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक

पूर्ववैमनस्यातून वाद पेटल्यानंतर एका तरूणाला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये त्या तरूणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा कसून शोध घेण्यास सुरूवात केली.

पूर्ववैमनस्यातून पेटलं भांडण, तरूणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक
| Updated on: Oct 12, 2023 | 3:48 PM
Share

धुळे | 12 ऑक्टोबर 2023 : धुळे शहरात गुन्ह्यांच प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. गुन्हेगार अक्षरश: मोकाट सुटले आहेत.त्यामुळे नागरीक धास्तावले असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान जुन्या वादातून एका तरूणाला एकटं गाठतं त्याचावर 8 ते 10 जणांनी हल्ला केल्याची घटना ताजीच आहे. या हल्ल्यात जबरदस्त जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे शहरात एकच दहशत माजली होती.

पोलिसांनी याप्रकरणाचा कसून तपास सुरू केला होता. अखेर त्या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुणे तसेच राजस्थान राज्यात कारवाई करत सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पूर्ववैमनस्यातून केला खून

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून शहरातील शुभम साळुंखे या तरुणाचा खून करण्यात आला होता. घरावर दगदफेक केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन 8 ते 10 जणांनी त्याला एकटं गाठलं. आणि धारदार कोयता, फाईट व लोखंडी रॉडने शुभम साळुंखे याला बेदम मारहाण करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. धुळे महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोमध्ये तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज संपली. शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विशेष पथके तयार करून तपास चक्र फिरवत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांनी खून केल्याचं कबूल केलं आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले असून या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा पोलीस तपास करत आहेत.

धुळ्यातील इतर बातम्या…

अतिक्रमण धारकांना सात दिवसात अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना

धुळे जिल्ह्यातील सर्वात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने दररोज वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे लहान मोठे अपघातही होत असतात. हीच बाब लक्षात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील प्रमुख सात रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी या अतिक्रमण धारकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

शहरातील जुना मुंबई आग्रा रोड ,चाळीसगाव रोड ,साखरी रोड, पारोळा रोड यावर लहान मोठ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. सात दिवसात आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे आदेश या सर्वांना देण्यात आले आहेत. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.