AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरबा सुरू होता, डीजे बंद झाला… डीजे ऑपरेटरचा मृत्यू, मृत्यूचं हे आहे कारण…

नाशिकच्या आडगाव शिवारात जय जनार्दन फाउंडेशनच्या वतीने आयोजित गरबा कार्यक्रमात दुर्दवी घटना घडली असून आडगाव पोलिसांकडून या मृत्यूच्या घटनेचा तपास केला जात आहे.

गरबा सुरू होता, डीजे बंद झाला... डीजे ऑपरेटरचा मृत्यू, मृत्यूचं हे आहे कारण...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Oct 05, 2022 | 4:03 PM
Share

नाशिक : नाशिकमध्ये नवरात्र उत्सवाला (Navratra Festival) गालबोट लागले आहे. गरबा खेळत असतांना नाशिकमध्ये (Nashik)  एक दुर्दैवी घटना घडली आहे. गरबा ऐन रंगात आलेला असतांना इलेक्ट्रिक शॉक डीजे ऑपरेटरचा मृत्यू (DJ Operator Death) झाला आहे. पप्पू बेंडकुळे असे डीजे ऑपरेटरचे नाव असून मंगळवारी रात्री ही घटना घडली असून या घटणेने हळहळ व्यक्त केली जात आहे. आडगाव परिसरात जय जनार्दन फाउंडेशन मंडळाकडून गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान ही घटना घडली असून आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकचा तपास करीत आहे. खरंतर तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त सण-उत्सव साजरे होत असतांना मोठा उत्साह नागरिकांमध्ये बघायला मिळत आहे. त्यातच ही घटना घडल्याने दसऱ्याला गालबोट लागल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते आहे.

नाशिकच्या आडगाव शिवारात जय जनार्दन फाउंडेशनच्या वतीने आयोजित गरबा कार्यक्रमात दुर्दवी घटना घडली असून आडगाव पोलिसांकडून या मृत्यूच्या घटनेचा तपास केला जात आहे.

गरबा ऐन रंगात आलेला असतांना डीजे अचानक बंद पडल्याने सगळेजण डीजे कडे बघायला लागले त्याच वेळी स्पार्क झाल्याचा आवाज झाला होता.

जय जनार्दन फाउंडेशन मंडळाच्या सदस्यांनी लागलीच डीजेकडे धाव घेतली आणि डीजे ऑपरेटरला शॉक लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

एकूणच या घटणेनंतर गरबा खेळण्यास आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला होता. मात्र, डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाल्याचे ऐकून सर्वच जण हळहळ व्यक्त करत होते.

गेल्या नऊ दिवसांपासून जोरदार गरबा खेळाला जात होता. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. त्याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.

Follow Us
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...