काही महिन्यांपूर्वीच लग्न, डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने; मात्र ‘असा’ झाला डॉक्टर दाम्पत्याच्या संसाराचा शेवट

रात्री उशिरापर्यंत मुलीने कॉल उचलला नाही. यामुळे सायमाच्या कुटुंबीयांनी तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सायमाच्या घरचे तिच्या घरी आले तेव्हा त्यांना काहीतरी घडल्याची शंका आली.

काही महिन्यांपूर्वीच लग्न, डोळ्यात सुखी संसाराची स्वप्ने; मात्र 'असा' झाला डॉक्टर दाम्पत्याच्या संसाराचा शेवट
गिझरचा शॉक लागून डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यूImage Credit source: NDTV
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 9:00 PM

हैदराबाद : बाथरुमधील गिझरचा शॉक लागल्याने (Due to geyser shock) डॉक्टर असलेल्या नवदाम्पत्याचा करुण मृत्यू (Doctor Couple Death) झाल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. डॉ. सैयद निसारुद्दीन आणि सायमा निसारुद्दीन अशी मयत डॉक्टर दाम्पत्याची नावे आहेत. डॉ. सैयद निसारुद्दीन हे सूर्यापेटमध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये (Government Medical College) कार्यरत होते. तर सायमा मेडिकल कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात शिकत होती. नवदाम्पत्याच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कशी घडली घटना?

पोलिसांच्या माहितीनुसार, आधी सायमाला शॉक लागला. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या डॉक्टरलाही शॉक लागला आणि दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री 11.30 वाजता उघडकीस आली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

असा झाला मृत्यूचा खुलासा

सायमाच्या वडिलांनी गुरुवारी सकाळी तिला फोन केला होता. मात्र ती कामात व्यस्त असल्याने रात्री घरी आल्यानंतर फोन करेन सांगत तिने फोन ठेवला. मात्र तिने संध्याकाळी कॉल केलाच नाही. आधी वडिलांना वाटले दोघे कामात व्यस्त असतील.

मात्र रात्री उशिरापर्यंत मुलीने कॉल उचलला नाही. यामुळे सायमाच्या कुटुंबीयांनी तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सायमाच्या घरचे तिच्या घरी आले तेव्हा त्यांना काहीतरी घडल्याची शंका आली. त्यांनी खिडकीतून आत प्रवेश केला. आत जाऊन पाहिले असता बाथरुममध्ये दोघांचे मृतदेह पडले होते.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.