125 किडनी, 50 खून… मगरींचा खुराक बनायचे मृतदेह, सीरियल किलरला अटक
...त्या हैवानाने मानवी अवयवाच्या रॅकेटसाठी अनेकांचा प्राणही घेतले. त्यांचे मृतदेह मगरींना खायला दिले. एका आश्रमातून पोलिसांनी त्याला साधूच्या वेषात असताना उपदेश देत असताना अटक केली आहे.

डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. परंतू जर डॉक्टरच रुग्णांच्या किडनी विकून अवयवाचा धंदा करत असेल तर त्यास काय म्हणावे ? डॉक्टर डेथ म्हणून कुख्यात असलेल्या या आरोपीला पुन्हा अटक झाली आहे. आयुर्वेदिक डॉक्टर पासून थेट सिरियल किलर बनलेल्या देवेंद्र शर्मा याला गेल्यावर्षी पॅरोल मिळाला आणि तो पसार झाला. आता त्याच्यावर पुन्हा कारवाई झाली आहे. परंतू आता तो अध्यात्मिक गरु बनून नवा धंदा उघडणार तोच त्याला पुन्हा बेड्या पडल्या आहेत.
देवेंद्र शर्मा खुखांर आहे. त्याने मानवी शरीराचा व्यापार करीत अनेकांचा प्राणही घेतले आहेत. किडनीसाठी त्याने अनेक जणांचे प्राण घेतले आणि त्यांचा मृतदेह मगरींना खायला दिले असल्याचा आरोप आहे. राजस्थानातील एका आश्रमातून दिल्ली पोलिसांनी त्याला साधूच्या वेषात असताना अटक केली आहे. आता आध्यात्मिक गुरु बनण्याचा त्याचा इरादा होता. परंतू पोलिसांनी त्याला कोर्टाच्या आदेशाने अटक केली आहे.




येथे पोस्ट वाचा –
🚨 ARREST ALERT: “Doctor Death” 👨⚕️💀 — The notorious serial killer & parole jumper fugitive is BACK IN CUSTODY! 🔒
⚡ Convicted for murders of taxi drivers 🚕⚰️ (2002-2004) ⚡ Jumped parole in 2023 ⛓️🏃♂️ while serving life at Tihar Jail ⚡ Mastermind behind kidnappings 🤐🚚,… pic.twitter.com/VvuPt46vWC
— Crime Branch Delhi Police (@CrimeBranchDP) May 20, 2025
शर्मा याने आयुर्वेदात BAMS डिग्री घेतली होती. आणि वैदू म्हणून दवाखाना थाटला होता. परंतू साल १९९४ च्या एका गॅस एजन्सीच्या डिल मध्ये त्याला मोठा तोटा झाला. त्यामुळे त्याची पावले गुन्हेगारीकडे वळल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर त्याने नकली गॅस एजन्सी सुरु केली. आणि हळूहळू तो किडनी ट्रान्सप्लांटच्या रॅकेटमधला एक दलाल झाला.
२००४ मध्ये शर्मा याला पहिल्यांदा अटक झाली होती. त्याच्याविरुद्ध दिल्ली, राजस्थान आणि हरियाणामध्ये सात विविध खून खटले दाखल होते, एका केसमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. एका प्रकरणात, गुरुग्राम न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली होती.
‘बाबा’ बनून उपदेश देत असताना
२०२३ मध्ये, शर्मा याला पुन्हा एकदा पॅरोलवर सोडले. परंतू ३ ऑगस्ट रोजी त्याचा पॅरोल संपल्यानंतरही तो तुरुंगात परतला नाही. दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखे त्याच्या शोधात होती. सहा महिने पोलिसांच्या पथकाने अलीगढ, जयपूर, दिल्ली, आग्रा आणि प्रयागराजपर्यंत त्याचा शोध घेतला. अखेर राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील एका आश्रमातून त्याला अटक झाली, जिथे तो लोकांना ‘बाबा’ म्हणून उपदेश देत असताना त्याला पोलिसांनी उचलले.
आधीही पॅरोलवर पळून गेला होता
देवेंद्र शर्मा पॅरोलवर असताना पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२० मध्येही तो २० दिवसांच्या पॅरोलनंतर सात महिने फरार झाला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला दिल्लीतूनच पकडले. इतक्या खतरनाक गुन्हेगाराला वारंवार पॅरोलवर का सोडले जात आहे याचे कोडे पडले आहे.
1998 ते 2004 पर्यंत , शर्मा याने देशातील विविध भागातून 125 हून अधिक अवैध किडनी ट्रांन्सप्लांट केले. यात अनेक डॉक्टर्स आणि दलाल सामील होते. पैशाच्या लालसेने त्याने डझनावरी गरीबाच्या किडनी विकल्या टॅक्सी ड्रायवरची हत्या आणि गाड्यांची विक्री
मृतदेह मगरींना खायला द्यायचा
2002 ते 2004 दरम्यान शर्मा याने एक नवीन पद्धतीने गुन्हा करण्यास सुरुवात केली. तो आपल्या साथीदारांच्या मदतीने टॅक्सी आणि ट्रक ड्रायव्हरना खोट्या भाड्याच्या बहाण्याने बोलवायचा. त्यानंतर रस्त्यात त्यांची हत्या करुन त्यांची वाहने ग्रे मार्केटमध्ये विकायचा. नंतर हे मृतदेह युपी येथील नाल्यात मगरींना भक्ष्य म्हणून खायला द्यायचा. हे संपूर्ण नेटवर्क एकदम मोठ्या चलाखीने चालले होते.